'आम्ही पळून लग्न करतोय!' काजोलसोबत टॅक्सीत बसून जेव्हा ड्रायव्हरला म्हणाला शाहरुख...

शाहरुख खानचे जगभरात असंख्य चाहते आहेत. चाहते शाहरुखबद्दलचा अनेक अपडेट वेळोवेळी शेअर करत असतात. अशाच एका चाहत्याने त्याच्या सोशल मीडियाव्दारे शाहरुख खान आणि काजोलचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Oct 3, 2023, 04:42 PM IST
'आम्ही पळून लग्न करतोय!' काजोलसोबत टॅक्सीत बसून जेव्हा ड्रायव्हरला म्हणाला शाहरुख... title=

मुंबई : शाहरुख खान आणि काजोल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन कपल मानलं जातं. शाहरुख आणि काजोलने सिनेसृष्टीला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. त्यांची मैत्री, त्यांचा बॉन्ड आणि केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच उत्सुक करत असते. खरंतर, काजोल आणि शाहरुख हे खऱ्या आयुष्यात एक जोडपं आहेत असा अनेक चाहत्यांना विश्वास होता, त्यांच्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटामुळे. एका कॅब ड्राईव्हरला त्यांनी लग्न करावे असं वाटत होतं.

शाहरुख खानचे जगभरात असंख्य चाहते आहेत. चाहते शाहरुखबद्दलचा अनेक अपडेट वेळोवेळी शेअर करत असतात. अशाच एका चाहत्याने त्याच्या सोशल मीडियाव्दारे शाहरुख खान आणि काजोलचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांचं सुंदर बॉन्डिंग आणि त्यांचा वेडेपणा दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये शाहरुख आणि काजोलचं एक कॅब ड्राईव्हर स्वागत करताना दिसत आहे. एहरान नावाच्या कॅब ड्रायव्हरनेने त्यांचं स्वागत केलं. काजोल आणि शाहरुखने त्याला शुभेच्छाही दिल्या. कॅब ड्राईव्हरने त्यांना म्हटलं की, तुम्ही विवाहित दिसत आहात. या प्रश्नाने अविचारीपणे शाहरुखने लगेच आपल्या विनोदी पद्धतीने उत्तर दिलं आणि म्हटलं की,  आम्ही पळून जात आहोत आणि लग्न करतोय. व्हिडिओमधील काजोलची प्रतिक्रीया पाहण्यासारखी आहे

काजोल आणि शाहरुख खानची मैत्री कशी झाली?
विशेष म्हणजे शाहरुख खानला सुरुवातीला काजोल आवडायची नाही. त्याला ती खूप बडबडी वाटायची. काजोल आणि शाहरुखने पहिल्यांदा बाजीगरमध्ये एकत्र काम केलं होतं. दोन आठवडे शूटिंग केल्यानंतर, SRK ने तिच्यासोबत काम करू इच्छिणाऱ्या आमिर खानला फोन केला की, ती खूप वाईट आणि खूप बडबडी आहे आणि तो तिच्यासोबत कधीही काम करू शकणार नाही.

पण त्याच संध्याकाळी, शाहरुखने बाजीगर सिनेमाची गर्दी पाहिली आणि त्याची विचार प्रक्रिया पूर्णपणे बदलली. कारण काजोलने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि यानंतर शाहरुखने आमिरला फोन केला आणि त्याने काजोलबदद्ल केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं. आणि काजोलबद्दलचे शब्द परत घेण्याचा प्रयत्न केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काजोलने एकदा सेटवरील किस्सा शेअर केला होता ज्यामध्ये ती म्हणाली होती की, शाहरुख आणि सेटवर इतर कलाकारांना खूप हँगओव्हर झाला आणि तरिही ती, नॉन-स्टॉप गप्पा मारत होती याबद्दल आणखी एक गोष्ट देखील शेअर केली. अशा प्रकारे त्यांची हळू हळू मैत्री होवू लागली.