लेडी पठाण! ब्लॅक जीन्स आणि जॅकेटमध्ये Gauri Khan चा हॉट लुक ठरतोय चर्चचा विषय

Gauri Khan: बॉलिवूड अभिनेत्रीची फॅशन हा कायमच चर्चेचा विषय असतो. कोणी कधी काय घातलंय इथपासून ते कोण कधी कुठली फॅशन (Bollywood Fashion) फोलो करतंय इथपर्यंत सगळ्यांची गोष्टींची जनमानसात चर्चा रंगलेली असते. 

Updated: Jan 6, 2023, 09:20 PM IST
लेडी पठाण! ब्लॅक जीन्स आणि जॅकेटमध्ये Gauri Khan चा हॉट लुक ठरतोय चर्चचा विषय  title=
bollywood producer gauri khan new lady boss look goes viral on interest netizens comments lady pathan

Gauri Khan: बॉलिवूड अभिनेत्रीची फॅशन हा कायमच चर्चेचा विषय असतो. कोणी कधी काय घातलंय इथपासून ते कोण कधी कुठली फॅशन (Bollywood Fashion) फोलो करतंय इथपर्यंत सगळ्यांची गोष्टींची जनमानसात चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका बॉलिवूड स्टार वाईफची चर्चा आहे आणि ती म्हणजे गौरी खान. गौरी खान (Gauri Khan) ही अभिनेत्री सध्या तिच्या एका वेगळ्याच लुकमध्ये चर्चेत आली आहे. या लुकमध्ये तिनं नक्की असं काय केलं आहे याची तिच्या चाहत्यांसकट नेटकऱ्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी तिनं जीन्स आणि जॅकेटचं अफलातून कॉम्बिनेशन ट्राय केलं आहे. (bollywood producer gauri khan new lady boss look goes viral on interest netizens comments lady pathan)

गौरी खान नुकतीच आपल्या मैत्रिणींसमवेत एका कॅफेच्या बाहेर स्पॉट झाली. तेव्हा पापाराझींचं (Paparazzi) तिच्या आऊटफिटनं लक्ष वेधलं. यावेळी तिनं पुर्ण डेनिम लुक केला होता. ब्लू जीन्स आणि त्यावर ब्लॅक टॉप परिधान करत तिनं ब्लॅक टॉपवर डेनिमचा (Black and Blue Denim Look) जॅकेट घातला होता आणि तिनं हेअरस्टाईल खूप सिंपल ठेवली होती. त्याचबरोबर तिनं हेअर पॉनी बांधून मेकअपही खूप डिसेंट केला होता. यावेळी तिनं ब्लॅक रेन बॅनही डोळ्यांवर घातला होता. या लुकमध्ये ती पुर्णपणे हॉट दिसत होती. त्यामुळे सगळ्या नजरा या तिच्याकडेच वळल्या होत्या. 

यावेळी गौरी खान ही आपल्या मैत्रिणींसोबत एका पॉश रेस्टोरंटमध्ये जाताना दिसली तिनं यावेळी आपल्या बेस्ट फ्रेंड्ससोबत डिनर किंवा लंन्च केल्याचं कळतंय. तिच्या कडे पाहून असं वाटतंच नाहीये की ती 3 मुलांची आई आहे. तिच्या ड्रेसकडे यावेळी फॅशननिस्टांच्याही बारिक नजरा खिळल्या होत्या. विशेष म्हणजे तिचं जॅकेट, यावेळी तिनं आपल्या जॅकेटचे हात वर केले होते त्यामुळे चिता प्रिंटचा (Chita Print) तिचा जॅकेट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. 

2021 मध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे (Aryan Khan Dating) शाहरूख खानसह गौरी खानही सार्वजनिक ठिकाणी फारशी दिसत नव्हती परंतु आता गेल्या दोन वर्षांनंतर आणि खासकरून आर्यन खानला झाल्या ड्रग्ज प्रकरणी क्लिन चीट मिळाल्यानंतर शाहरूख खानसह गौरी खानही सार्वजनिक ठिकाणी बाहेर येऊ - फिरू लागली आहे. सध्या शाहरूख खानचा पठाण हा सिनेमा (Paathan Controversy) लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर शाहरूख आणि गौरी खानची लेक सुहाना खानही झोया अख्तरच्या द आर्चिज या नेटफ्लिक्सच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. तेव्हा हे 2023 वर्षे खान कुटुंबियांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

शाहरूख खानचा आणि दीपिका पादूकोणचा पठाण हा चित्रपट मात्र प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सुहाना खान (Suhana Khan Dating) अमिताभ बच्चन यांच्या नातवला अगस्त्या नंदाला डेट करतं असल्याचं बोललं जात आहे.