आमिर खान सोबतच्या किसींग सीनमुळे चर्चेत आली होती, 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Updated: Jan 6, 2023, 08:56 PM IST
आमिर खान सोबतच्या किसींग सीनमुळे चर्चेत आली होती, 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? title=

Childhood Photos Actresses : सोशल मीडियावर सेलिब्रेटिंचे लहानपणीचे फोटोज अनेकदा व्हायरल होत असतात. अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे.  90 च्या दशकातील (90's Top Actresses) अशाच एका सुपरस्टार अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल झालेला आहे. या फोटोमध्ये दिसत असलेल्या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. (Did you know the this actress who was in the news due to her kissing scene with Aamir Khan  latest entertainment news)
 
या अभिनेत्रीने बॉलिवूडमधील तिन्ही खानसोबत काम केलं आहे. इतकंच नाहीतर त्यांच्यासोबतचे हिचे चित्रपट एकदम हिट ठरले होते. तुम्हाला एक हिंट अशी आहे की, फोटोमधील अभिनेत्री कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे जिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. याआधी राज कपूरपासून ऋषी कपूरपर्यंत या कुटुंबातील केवळ पुरुषच चित्रपटात काम करत होते. फोटोमध्ये दोन वेण्यांमध्ये बांधलेली अभिनेत्री तिच्या आईसोबत दिसत आहे. निरागस दिसलेली अभिनेत्रीची आईसुद्धा तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती.

तुमच्या अजूनही लक्षात आलं नसेल तर आम्ही सांगतो ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून करिष्मा कपूर आहे. करिष्मा कपूरने अनेक हिट चित्रपच दिले आहेत. 90 च्या दशकामध्ये करिष्माने जिगर 1992, अनारी 1993, राजा बाबू, सुहाग 1994, गोपी किशन 1994, कुली नंबर1 1995, जुडवा, साजन चले ससुराल असे अनेक चित्रपट दिले आहेत. 

करिष्मा कपूरनंतर तिची धाकटी बहिण करीना कपूरनेही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी करिना कपूरही एक आहे. दोघींचं बाँडिंगही खूप चांगलं असून दोघीही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात.