दूधवाल्याच्या मुलीवर प्रेम, राजेश खन्नासाठी बनला इलेक्ट्रिशन...ओळखा बरं हा सुपरस्टार आहे तरी कोण?

Bollywood News : या फोटोमधील चष्मा घालून वडिलांच्या मांडीवर बसलेला मुलगा हा बॉलिवूडचा सुपरस्टार...त्याचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. तुम्ही ओळखला का या चिमुकल्याला? 

नेहा चौधरी | Updated: Aug 1, 2023, 11:14 PM IST
दूधवाल्याच्या मुलीवर प्रेम, राजेश खन्नासाठी बनला इलेक्ट्रिशन...ओळखा बरं हा सुपरस्टार आहे तरी कोण? title=
Bollywood News fell in love with milkman daughter became electrician for rajesh khanna this superstar childhood photos

Bollywood News : सोशल मीडियावर बॉलिवूड सुपरस्टार आणि सेलिब्रिटीचे बालपणीचे अनेक फोटो तुफान व्हायरल होत असतात. अनेकांना आपला आवडता कलाकार लहानपणी कसा दिसायचा हे जाणून घ्यायला खूप आवडतं. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या लहानपणींचे अनेक फोटो पाहिला मिळतात. यातील काही फोटो पाहिले तर आपल्याला अंदाजही लावता येत नाही, की तो फोटोमधील चिमुकला आज लाखो हृदयांचा राजा असतो. असाच एका दिग्गज अनिभेत्याच्या लहानपणीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. (Bollywood News fell in love with milkman daughter became electrician for rajesh khanna this superstar childhood photos )

या फोटोमध्ये वडिलांच्या मांडीवर गोंडस आणि चष्मा लावून एक मुलगा बसला आहे. या चिमुकल्याने मोठं होऊन दुधवाल्याच्या मुलीवर प्रेम केलं. अगदी बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासाठी तो इलेक्ट्रिशन झाला होता. यावरुन तरी तुम्हाला काही अंदाज लावता आला का की हा कलाकार कोण असेल ते?

हा दिग्गज अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आमच्या तुमच्या लाडका इरफान खान आहे. आज इरफान खान आपल्यामध्ये नाही. पण अभिनयाने तो आजही लाखो हृदयात घरुन आहे. इरफान खानने एका मुलाखतीत त्याची लव्ह स्टोरी सांगितली होती. तो म्हणाला होती की, तो दुधवाल्याच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. तिला पाहण्यासाठी इरफान अनेक वेळा दुधवाल्याकडे दूध आणायला जायचा. 

पण हे प्रेम अधुरं राहिलं कारण ही तरुणी दुसऱ्या मुलाच्या प्रेमात होती. तिने त्या मुलाला देण्यासाठी इरफान खानला पत्र दिलं होतं. त्यावेळी इरफान खान फक्त 16 वर्षांचे होते. 

irrfankhan

हेसुद्धा वाचा - 'या' बालकलाकाराला तुम्ही ओळखलंत का? आज एका चित्रपटासाठी घेतो 100 कोटींचे मानधन

काकासाठी इलेक्ट्रीशियन बनला हा या किस्सा तर मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा इरफान खान मुंबईत आला होता. तेव्हा पैशांसाठी तो मिळेल ते काम करत होता. एकदा राजेश खन्ना यांच्या घरातील एसी खराब झाला होता. त्यावेळी इरफान खान राजेश खन्नांकडे एसी ठिक करण्यासाठी गेला होता.