राकेश बापटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्याची प्रकृती खालावली

राकेशने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. राकेशने सोशल मीडिवर हॉस्पिटलमधला एक फोटो पोस्ट केला आहे. 

सायली कौलगेकर | Updated: Aug 1, 2023, 05:16 PM IST
राकेश बापटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्याची प्रकृती खालावली title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी कपल कायम चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. तर कधी त्यांच्यात होणाऱ्या वादांमुळे ते चर्चेत असतात.  असंच एक बॉलिवूडचं कपल म्हणजे शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट(Raqesh Bapat). राकेश आणि शमिता त्यांच्या रिलेशनशिपमुळे जेवढे चर्चेत आले होते तेवढेच ते त्यांच्या ब्रेकअपमुळेही चर्चेत आले होते. टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता राकेश बापटच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी आहे. खरंतर, अभिनेता सध्या रुग्णालयात दाखल आहे. खुद्द अभिनेत्याने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

नुकतीच राकेशने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. राकेशने सोशल मीडिवर हॉस्पिटलमधला एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातावर सलाईन लावल्याचं दिसत आहे. मात्र त्याचा चेहरा या फोटोत दिसत नाहीये. या फोटोसोबत राकेशने Evil Eye चा आयकॉन देखील शेअर केला आहे.

अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. त्याचे चाहते त्याची अशी अवस्था पाहून चिंतेत दिसत आहेत. त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते त्याला त्याची अशी अवस्था का झाली असे प्रश्न विचारत आहेत. मात्र त्याला नक्की काय झालंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

राकेश बापट आत्तापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये झळकला आहे.  बीग बॉसमधून तो घराघरात पोहचला यावेळी त्याच्या रिलेशनशिपचीही खूप चर्चा झाली होती. राकेश बापट ' 'तेरे विच रब दिस्दा' या म्युझिक व्हिडिओमध्ये शेवटचा दिसला होता.  'सात फेरे', 'होंगे जुदा ना हम', 'कुबूल है', 'ये है आशिकी', 'बहू हमारी रजनीकांत' आणि 'इश्क में मरजावां' अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 
 
एकीकडे अकांत एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या शमिता आणि राकेशला वेगळं पाहून चाहत्यांना धक्का बसला होता. सगळं काही छान सुरु असताना अचानक राकेशनने पोस्ट शेअर करत लिहीलं होतं की, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की, मी आणि शमिता आता एकत्र नाहीत. हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. मात्र मला आशा आहे की, जेवढं प्रेम तुम्ही आम्हा दोघांना दिलं होतं तेवढंच तुम्ही आम्हाला वेग-वेगळं प्रेम द्यालं. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.