बापरे! ज्या अभिनेत्रीला काम दिलं, तिच म्हणते मी काही सलमानच्या...

एक यशस्वी अभिनेता असण्यासोबतच त्यानं अनेकांना दिलेला मदतीचा हातही त्याची लोकप्रियता सातत्यानं वाढवत गेला

Updated: Jan 20, 2022, 10:32 AM IST
बापरे! ज्या अभिनेत्रीला काम दिलं, तिच म्हणते मी काही सलमानच्या... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सलमान खान, म्हणजे अनेक नवख्या चेहऱ्यांसाठी गॉडफादर. बॉलिवूडमध्ये आजमितीस सलमानच्या मदतीनं अनेकांनी पदार्पण केलं. एक यशस्वी अभिनेता असण्यासोबतच त्यानं अनेकांना दिलेला मदतीचा हातही त्याची लोकप्रियता सातत्यानं वाढवत गेला. सलमाननं बॉलिवूडमध्ये आणलेल्या अशाच एका अभिनेत्रीनं नुकतंच त्याच्यासोबतचं नातं सर्वांसमोर आणलं. (salman khan)

तिच्या आतापर्यंतच्या यशाचं सर्व श्रेय सलमानला जातं, त्याच्यामुळेच तिला सर्व कामं मिळाली याबाबतचं खरं चित्र तिनं सर्वांसमोर ठेवलं. 

जिला सलमाननं काम दिलं, तिच अभिनेत्री आता म्हणतेय की मी काही सलमानच्या मागे लहानसहान कारणांसाठी फिरणारं माकड नाही. 

ही अभिनेत्री आहे झरिन खान. 'वीर' या चित्रपटातून झरिननं बॉलिवूमध्ये पदार्पण केलं. सलमानसोबत तिनं यात स्क्रीन शेअर केली. 

मग झरिन असं का म्हणाली.....? तिच्या बोलण्यातून पुढे हे चित्र अधिक स्पष्ट झालं. 

सलमान नसता तर बॉलिवूडमध्ये पदार्पण झालंच नसतं असं झरिन मानते. त्यानं इंडस्ट्रीमध्ये पाय घट्ट रोवण्यासाठी बरीच मदत केल्याचंही ती स्वीकारते. 

पण, आपला खरा संघर्ष हा त्यानंतर सुरु झाला. कारण बॉलिवूडमध्ये आले खरी, पण त्यानंतर मात्र कोणाचीही ओळख नव्हती, असं ती म्हणते. 

सलमान एक अतिशय उत्तम व्यक्ती आहे. तो फार व्यग्र असतो. अशा वेळी सतत एखाद्या माकडासारखं लहानसहान गोष्टींसाठी त्याच्या मागेमागे करणं योग्य नाही, असं झरिनचं मत. 

आपण आज जे मिळवलंय ते सर्वच यश सलमानमुळे, असा अनेकांचा समज आहे. पण, तसं नाही. 

I cannot be a monkey on Salman Khan's back,' says Zareen Khan

सलमान हा अतिशय चांगला मित्र आहे, एका फोनवर तो धावत येतो, ही बाब तिनं इथं प्रकर्षानं मांडली. 

कला जगतामध्ये 12 वर्षे तग धरणारी झरिन आजही म्हणजे मी कोणत्या शर्यतीचा भाग नाही. पण, जोपर्यंत इथं तुम्ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाही, तोवर तुमची जागा कोणीही घेऊ शकतं ही भीती मात्र तिच्या मनात आजही कायम आहे.