प्रियंका चोप्राच्या 'या' व्यक्तव्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री होतील नाराज?

प्रियंका चोप्रा झाली ट्रोल

प्रियंका चोप्राच्या 'या' व्यक्तव्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री होतील नाराज?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा क्वांटिकोच्या वादातून पूर्णपणे बाहेर आली नसता आणखी एक नवा वाद तिच्यासमोर उभा राहिला आहे. प्रियंका चोप्राने मीडियाशी गप्पा मारताना बॉलिवूडवर टिपणी केली. ज्यामध्ये तिने ते लोकांनी अतिशय लाजिरवाणं म्हटलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक जर्नलिस्ट प्रियंकाला विचारतेय की, इंडियन फिल्म्स इज ऑल अबाऊट हिप्स अॅण्ड बूब्स. प्रियंकाच्या या वक्तव्यामुळे सध्या तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. 

 

Priyanka Chopra making fun of bollywood and Indian actrsses?? #rvcjmovies #rvcjinsta

A post shared by RVCJ Movies (@rvcjmovies) on

एका बाजूला लोकं या वक्तव्याची टीका करत आहेत तर दुसरीकडे लोकं म्हणतात की, प्रियंकाला विसरून चालणार नाही की ती बॉलिवूडमधून लोकप्रिय झाली आहे. आणि त्यामुळेच ती हॉलिवूडमध्ये गेली आहे. प्रियंकाच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील अभिनेत्री नाराज होती यात काही शंकाच नाही. हॉलिवूड टीव्ही शो 'क्वांटिको' सीझन 3 मधील एपिसोड सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि त्यावर प्रियंकाला ट्रोल करण्यात आलं आहे.