VIDEO :'संजू' सिनेमातील नवं गाणं रिलीज

विचार करायला लावणार गाणं 

मुंबई : राजकुमार हिरानी यांचा 'संजू' या सिनेमाचं दुसरं गाणं 'कर हर मैदान फतह' हे लाँच झालं आहे. या गाण्यात संजय दत्तची बहिण प्रिया दत्तची झलक पाहायला मिळाली आहे. प्रिया दत्तचं संजय दत्तच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. आणि हेच या गाण्यातून दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री अदिति गौतमने या सिनेमांत संजय दत्तच्या बहिणीची प्रिया दत्तची भूमिका साकारली आहे. ज्याची झलक या सिनेमांत पाहायला मिळाली आहे. या गाण्यात रणबीर कपूरचा वेगळा अंदाज बघायला मिळाला आहे. अगदी काही मिनिटांत हा व्हिडिओ यूट्यूबवर 2 लाखाच्या घरात पोहोचलं आहे. 

sanju

संजय दत्तचा संजू हा सिनेमा खूप चर्चेत आहे. रणबीर कपूरने यामध्ये साकारलेली भूमिका खूप चर्चेत आहे. रणबीर कपूरच्या वडिलांनी ऋषी कपूर यांनी देखील त्याच्या अभिनयाच कौतुक केलं आहे. हा सिनेमा 29 जून रोजी प्रदर्शित होत आहे.