लाल सिंग चड्ढाच्या अपशयानंतर Kareena लागली 'या' नव्या कामाला; Ekta Kapoor ची मिळाली साथ

काही दिवसांपूर्वी ती मुलगा जेह अली खानसोबत लंडनला (Kareena Kapoor at London) गेली होती. 

Updated: Oct 6, 2022, 08:52 PM IST
लाल सिंग चड्ढाच्या अपशयानंतर Kareena लागली 'या' नव्या कामाला; Ekta Kapoor ची मिळाली साथ title=

Kareena Kapoor New Film: करीना कपूर आणि आमिर खानचा बहूचर्चित चित्रपट लाल सिंग चड्ढा हा बॉक्स ऑफिसवर सपशेल (Laal Singh Chaddha Box Office Collection) फेल गेला. करीना कपूर आणि आमिर खान दोघांनी आपल्या या अपशयावर भाष्य केले. आमिर खाननंही प्रेक्षकांना विनवणी केल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांनी आमिर खानचा चार वर्षांनंतर आलेला हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केलीच नाही. (bollywood actress kareena kapoor going start a new film after the failure of laal singh chaddha)

परंतु आता करीना मात्र आपल्या नव्या चित्रपटाच्या तयारीसाठी लागली असल्याची माहिती समोर येते आहे. करीना कपूर लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच तिच्या 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' (The Devotion of Suspect Ex) या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले असून आता ती तिच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता करीना कपूर लवकरच आपल्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येते आहे. एकता कपूर (Ekta Kapoor) निर्मित आहे आणि हंसल मेहता (Hansal Mehta) दिग्दर्शित हा सिनेमा असल्याचे त्यांनी शेअर केलेल्या फोटोवरून समजते आहे.

आणखी वाचा - 'पार्टीत शाहरूख खानच्या तशा वागण्यामुळं आम्हाला रस्त्यावरच...' रितेश देशमुखच्या वक्तव्यावरून एकच खळबळ

हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्याच वेळी करीनानं सेटवरील एक फोटो पोस्ट केला होता आणि आपल्या फोटोत हंसल मेहता आणि एकता कपूरला टॅग केले आहे. 

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समोर आलेल्या माहितीनुसार, करीना चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी ती मुलगा जेह अली खानसोबत लंडनला (Kareena Kapoor at London) गेली होती. या फोटोंमध्ये करीना खूपच उत्साहित दिसते आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नसला तरी करीनाला तिच्या भूमिकेवरून प्रेक्षकांनी तिचं कौतुकही केलं होतं. 'डार्लिंग्स' (Darlings) फेम विजय वर्मा आणि जयदीप अहलावत देखील या प्रोजेक्टमध्ये त्याच्यासोबत दिसणार आहेत अशी माहितीही कळते आहे.