यांना एंट्रीच दिली नाही पाहिजे... ; 'पुष्पा'च्या यशानंतर कंगना कोणावर संतापली?

आगपाखड करणाऱ्या या अभिनेत्रीनं पुन्हा एकदा शब्दांचे बाण चालवले आहेत. 

Updated: Jan 24, 2022, 12:05 PM IST
यांना एंट्रीच दिली नाही पाहिजे... ; 'पुष्पा'च्या यशानंतर कंगना कोणावर संतापली?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut)ही कायमच तिच्या भूमिकांमुळे चर्चेत येते. भूमिका मग ती रुपेरी पडद्यावरची असो किंवा प्रत्यक्ष आयुष्यातील. कंगना व्यक्त झाली की त्याची लगेचच चर्चा सुरु. सातत्यानं बॉलिवूड, घराणेशाही या मुद्द्यांवरून आगपाखड करणाऱ्या या अभिनेत्रीनं पुन्हा एकदा शब्दांचे बाण चालवले आहेत. 

आता कंगनाचे हे बाण नेमके कोणासाठी आहेत, हे एकदा जाणून घ्यायलाच हवं. 

'पुष्पा' (Pushpa the rise) या चित्रपटाच्या दमदार कामगिरीनं सर्वांचेच डोळे दीपले. ज्यावर कंगनाही व्यक्त झाली. 

यावेळी तिनं बॉलिवूडकरांवर थेट निशाणा साधत त्यांना एंट्रीच दिली नाही पाहिजे असंही सांगितलं. 

दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशामागचं गणित तिनं सर्वांना सांगितलं. 

इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून कंगनानं लिहिलं, 'पहिलं कारण म्हणजे, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि ही मंडळी भारतीय संस्कृतीच्या मुळांशी जोडलेली आहेत. 

त्यांचं त्यांच्या कुटुंबांवर प्रेम आहे ज्यामुळं इथं पाश्चमात्य संस्कृती डोकावत नाही. 

कामाप्रती त्यांची एकनिष्टा आणि समर्पक वृत्ती अद्वितीय आहे, त्यामुळं त्यांनी बॉलिवूडकरांना त्यांना भ्रष्ट करण्यासाठी कलाजगतात एंट्रीच दिली नाही पाहिजे.'

कंगनानं केलेली ही पोस्ट पाहता आता तिनं साधलेला हा निशाणा नेमका कोणाकोणाला लागला, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

बरं इथं मुख्य मुद्दा असा, की कंगनाही बॉलिवूड अभिनेत्रीच आहे. परिणामी तिला एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर आल्यास त्यावर यापुढे तिची काय भूमिका असेल हे पाहणंही औत्सुक्याचं.