हातात ग्लास अन् तुफान Dance; पाहा ऐश्वर्या- दीपिकाचा कल्ला

व्हिडीओमध्ये स्पष्टच दिसत आहे की...

Updated: Nov 17, 2021, 02:10 PM IST
हातात ग्लास अन् तुफान Dance; पाहा ऐश्वर्या- दीपिकाचा कल्ला title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पदुकोण या खऱ्या अर्थानं बॉलिवूड गाजवणाऱ्या सौंदर्यवती. ऐश्वर्या आणि दीपिका या दोन्ही अभिनेत्रींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडीओ प्रचंड वेगानं व्हायरल होण्याचं कारण ठरत आहे, त्यामध्ये तुफान डान्स करणाऱ्या ऐश्वर्या आणि दीपिका. 

हा व्हिडिओ सध्याचा नाही, तर मुकेश अंबानी यांची कन्यी ईशा अंबानीच्या लग्नातील हा व्हिडीओ आहे. 

व्हिडीओमध्ये स्पष्टच दिसत आहे की, सुखबीर सिंग ज्यावेळी 'इश्क तेरा तडपावे' हे गाणं गातो तेव्हा ऐश्वर्या दीपिकाला खेचतच स्टेजवर आणते. 

हातात एक पेय असणारा ग्लास घेऊन दीपिकाही उत्साहात स्टेजवर येते आणि तिथं या दोघीही तुफान नाचू लागतात. 

रणवीर सिंग, खुद्द नीता अंबानी, त्यांची बहीण, अभिषेक बच्चन ही मंडळीसुद्धा या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. पण, दीपिका आणि ऐश्वर्याचा ठुमकाचा 'लाजवाब' ठरत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर अनेकजण व्यक्त होत आहेत. कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देत या दोघींच्या डान्सला दाद देत आहेत.

दीपिका आणि ऐश्वर्याचे डान्स व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले असतील. पण, हा व्हिड़ीओ आणि तिथं दिसणारा या दोघींचा अंदाज बराच खास आहे यात वाद नाही.