Salman Khan च्या पाकिस्तानी प्रेयसीकडून मोठा खुलासा, त्याने मला...

खासगी आयुष्याबाबतचं कुतूहल मात्र तसुभरही कमी झालेलं नाही.   

Updated: Jan 6, 2022, 10:24 AM IST
Salman Khan च्या पाकिस्तानी प्रेयसीकडून मोठा खुलासा, त्याने मला...  title=

मुंबई : भाईजान सलमान खान याच्या लग्नाची चर्चा आता बऱ्यापैकी शमली असली तरीही या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबाबतचं कुतूहल मात्र तसुभरही कमी झालेलं नाही. काही अभिनेत्रींशी सलमानचं नाव जोडलं गेलं, तर काहींसोबत तर त्याच्या लग्नाची चर्चाही समोर आली. (Salman Khan)

सध्या सलमानच्या पहिल्यावहिल्या प्रेयसीनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. कारण ठरत आहे ते म्हणजे त्यांच्या नात्याबाबत करण्यात आलेला एक खुलासा. 

पाकिस्तानी- अमेरिकन अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) हिची बॉलिवूडमधील कारकिर्द फारशी मोठी नव्हती.

'यार गद्दार', 'आंदोलन' आणि 'अंत' अशा चित्रपटांमधून ती झळकली होती. पण, तिच्या कारकिर्दीपेक्षा खासगी आयुष्याचीच जास्त चर्चा झाली. 

सलमानसोबतच्या नात्यानं तिला अधिक प्रकाशझोतात आणलं. आता म्हणे सलमानसोबतच्या लग्नाबाबत तिनं एक मोठा खुलासा केला आहे. 

सलमानशी लग्न करण्यासाठी गाठली मुंबई ... 
90 च्या दशकात सलमान आणि सोमीच्या नात्याची सर्वदूर माहिती पसरली होती. हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं याबाबतचा खुलासाही केला. 

'आम्ही हिंदी चित्रपट पाहायचो. मैने प्यार किया पाहिल्यानंतर मला सलमान आवडू लागला होता. त्यावेळी मी एक स्वप्न पाहिलं आणि भारतात येण्याचं ठरवलं. 

अवघ्या 16 वर्षांच्या वयात मुंबईत येऊन सलमानशी लग्न करणं हा विचारही माझ्यासाठी विचित्रच होता. 

सलमानशी लग्न करण्यासाठी मी मुंबईला जातेय असं आईला सांगत मी सूटकेस शोधत होते', असं सोमी म्हणाली. 

लग्नाची मागणी... 
नेपाळला जात असताना एकदा सलमान आणि सोमी बाजुलाच बसले होते. तिनं त्याचा फोटो काढला आणि त्याला दिला. 

मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी आलेय, असं तिनं त्याला सांगितलं. पण, माझी प्रेयसी आहे असं उत्तर तिला सलमानकडून मिळालं. 

मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही, असं म्हणत तिनं सलमानची साथ मिळवण्याचा अट्टहास केला. सोमी 17 वर्षांची असताना सलमान आणि तिच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली. 

अखेर सलमाननंही तिच्यावरील प्रेमाची कबुली दिली होती. सलमान आणि सोमीचं नातं रुळावर आलं खरं. पण, त फार काळ तग धरू शकलं नाही. अखेर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या.