मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्याच्या घडीचा आघाडीचा अभिनेता आहे. ओटीटी विश्वावर देखील त्याने स्वत:ची एक वेगळी छाप सोडलीय. एका अहवालानुसार ओटीटी विश्वात सर्वांधिक कमाई करण्याच्या क्रमवारीत सैफ पहिल्या क्रमांकावर येतो. मात्र तरीही सैफला 'या' भूमिकेचा पश्चाताप वाटला होता. त्याने एका मुलाखतीत याबाबतचा किस्सा सांगितला.
सैफ अली खान अनेक उत्कृष्ट अभिनय केले आहेत. या मधल्या त्याच्या अनेक भूमिका गाजल्या होत्या. मात्र काही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या नाही. तर आता सैफ अली खानने त्याच्या एका भूमिकेबद्दल उघडपणे सांगितले, तो म्हणतो की त्याला त्या एका भूमिकेची खूप लाज वाटली होती.
चित्रपट कोणता होता ?
साजिद खानच्या २०१४ मध्ये आलेल्या 'हमशकल्स' चित्रपटात सैफ अली खान, राम कपूर आणि रितेश देशमुख यांनी स्त्रीचं पात्र साकारलं होत. या भूमिकेबद्दल एका मुलाखतीत बोलताना सैफ म्हणाला, चित्रपटातील त्याच्या एका फोटोमध्ये तो समुद्रकिनारी धावत होता. ते चित्र पाहून सैफ म्हणाला, 'अरे देवा, माय गॉड. साजिद, त्याने आमचे काय केले? हे काय चालले आहे? हे खूप लाजिरवाणे आहे. ही भूमिका साकारल्याचा त्याला पश्चाताप वाटतो.
'हमशकल्स' बॉक्स ऑफिसवर चांगलीच आपटली होती. चित्रपट समीक्षकांकडून अत्यंत नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकांनी याला 0 रेटींग दिले होते. यावर बोलताना सैफ म्हणाला की, 'चित्रपटाची कोणतीही स्क्रिप्ट नव्हती, हे सर्व साजिदच्या मनात असल्याचा खुलासा त्याने केला होता.
दरम्यान सैफ अली खान आगामी विक्रम वेध सिनेमात दिसणार आहे. तसेच सैफकडे ओम राऊतचा 'आदिपुरुष' देखील आहे, ज्यामध्ये त्याने प्रभास आणि क्रिती सेननसोबत काम केले आहे.