'Animal 3' संदर्भात रणबीर कपूरची मोठी घोषणा, सिक्वेलबाबत काय म्हणाला रणबीर?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने 'रामायण' नंतर त्याच्या आगामी 'ॲनिमल 3' आणि 'ब्रह्मास्त्र 2' या चित्रपटांबद्दल एक मोठं विधान केलं आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 9, 2024, 01:49 PM IST
'Animal 3' संदर्भात रणबीर कपूरची मोठी घोषणा, सिक्वेलबाबत काय म्हणाला रणबीर?  title=

Animal 3 Update: रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामध्ये रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदानाने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये चित्रपटाच्या पुढील सिक्वेलची माहिती देण्यात आली होती. अशातच आता रणबीर कपूरने 'अॅनिमल' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. रणबीर कपूरने रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये 'अॅनिमल' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. रणबीरच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. चाहते आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी प्रचंड उत्सुक आहेत. 

दरम्यान, रणबीर कपूरने 'अॅनिमल' चित्रपटाच्या सिक्वेलबाबत टीम चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला 2027 मध्ये सुरुवात होणार आहे. 'अॅनिमल' चित्रपटाचे दिग्दर्शन साउथचे दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांनी केलं होतं. आता पुढे देखील चित्रपटाचे दिग्दर्शन तेच करणार आहेत. 

रणबीरची 'अॅनिमल 3' संदर्भात मोठी घोषणा

रणबीर कपूरने रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये 'अॅनिमल 3' चित्रपटाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. यामध्ये त्याने म्हटलं की, 'अॅनिमल 3' चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2027 मध्ये सुरु होणार आहे. यावेळी संदीप यांनी म्हटले की, हा चित्रपट फक्त 3 भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. दुसऱ्या भागाचे नाव 'अॅनिमल पार्क' आहे. 'अॅनिमल' चित्रपटाच्या पहिल्या भागापासूनच आम्ही या चित्रपटाच्या पुढील भागांबाबत विचार केला होता. तिसरा भाग खूपच रोमांचक असणार आहे. कारण यामध्ये दोन भूमिका साकारायच्या आहेत. खलनायक आणि नायक. हा एक खूपच रोमांचक प्रोजेक्ट आहे. या पुढील भागासाठी मी खूप उत्सुक आहे. 

'अॅनिमल' चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कहानी अशा एका व्यक्तीसोबत फिरते की, ज्यामध्ये त्या मुलाची त्याच्या वडिलांसोबत टॉक्सिक रिलेशनशिप असते. चित्रपटात विजयला अशा प्रकारे दाखवण्यात आलं आहे की, तो वडिलांच्या सुरक्षेसाठी कहीही करू शकतो. या चित्रपटाने जगभरात 900 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील काही चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले होते.