'पार्टीत शाहरूख खानच्या तशा वागण्यामुळं आम्हाला रस्त्यावरच...' रितेश देशमुखच्या वक्तव्यावरून एकच खळबळ

असेच अनेक मोठंमोठे सेलिब्रेटी आहेत जे स्वतःहूनच त्यांच्या घरी बॉलीवूड मंडळींसाठी पार्टीचे आयोजन केले जाते.

Updated: Oct 5, 2022, 06:05 PM IST
 'पार्टीत शाहरूख खानच्या तशा वागण्यामुळं आम्हाला रस्त्यावरच...' रितेश देशमुखच्या वक्तव्यावरून एकच खळबळ  title=

Ritesh Deskhmukh on Shah Rukh Khan: बॉलीवूडमध्ये पार्टी नाही अस होणारच नाही. मोठं मोठे सेलिब्रेटी कायमच पार्टीमध्ये गुंग असतात. पार्टीशिवाय या इंडस्ट्री ना कुणाला कुणाची ओळख होते ना कुणाला कोणी कळतं नाही. (bollywood actor open up about shah rukh khan and his friendly behaviour in his parties at mannat)

असेच अनेक मोठंमोठे सेलिब्रेटी आहेत जे स्वतःहूनच त्यांच्या घरी बॉलीवूड मंडळींसाठी पार्टीचे आयोजन केले जाते. त्यातलाच एक अभिनेता आहे तो म्हणजे शाहरूख खान. वांद्रे येथील मन्नतच्या पार्ट्यांना बॉलीवूड कलाकारांची चांगलीच हजेरी असते. शाहरूख खान त्याची पत्नी गौरी खान अनेकदा त्यांच्या घरी त्यांच्या मित्रमैत्रीणींसाठी पार्ट्यांचे आयोजन करत असतात. 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखनं शाहरूखच्या पार्टीतला एक खळबळजनक किस्सा सांगितला आहे. पार्टीत शाहरूख खान कसा वागतो याबद्दल त्यांनं हा खुलासा केला आहे. 

रितेश आणि शाहरुखने 'हे ​​बेबी' चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात रितेश मुख्य भूमिकेत होता तर शाहरुख खानने छोटी भूमिका केली होती. रितेश आणि शाहरूख यांची मैत्री चांगली आहे, दोघेही इंडस्ट्रीतले चांगले मित्र आहेत परंतु रितेशने मन्नतच्या पार्ट्या आणि शाहरुख खानच्या त्या एका सवयीबद्दलचं गुपित उलगडलं आहे.

मन्नतवर पाहूणचार नक्की कसा केला जातो, याबद्दल रितेशला विचारण्यात आले तेव्हा रितेश म्हणाला की, 'जेव्हा आम्ही मन्नतमध्ये एकत्र होतो तेव्हा जेवण पहाटे 3 वाजता दिले जात होते. पण शाहरूखची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही घरी जाण्यासाठी तुमच्या कारकडे जाता तेव्हा शाहरुख खान स्वतः येऊन तुमच्या कारचा दरवाजा उघडतो. अशी गोष्ट शाहरूखमध्ये आहे. 

अलीकडेच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये गौरी खानने शाहरुखच्या या सवयीवर नाराजी व्यक्त केली होती. ती म्हणाली होती की, 'तो नेहमी पाहुण्यांना त्याच्या गाडीत सोडायला जातो. कधीकधी मला असे वाटते की तो पार्ट्यांपेक्षा जास्त बाहेरच वेळ घालवतो. मग लोक त्याला शोधू लागतात. आपण आतूनच रस्त्यावर पार्टी करत आहोत, असे मला वाटते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2023 हे वर्ष शाहरुख खानसाठी खूप महत्त्वपुर्ण असणार आहे. त्याचे तीन चित्रपट 2023 मध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. जानेवारीमध्ये तो यशराज फिल्म्सच्या पठाणमध्ये दिसणार आहे. यानंतर तो जूनमध्ये अटलीच्या पहिल्या हिंदी चित्रपटात, 'जवान'मध्ये दिसणार आहे. यानंतर राजकुमार हिरानीचा 'डंकी' हा त्याचा 2023 सालचा शेवटचा रिलीज होणारा चित्रपट असेल.