रिक्षामध्ये सायकल ठेवून मुंबईच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या या सेलिब्रिटीला ओळखलत का?

या फिटनेसफ्रिक सेलिब्रिटीच्या फोटोवर त्याच्या बहिणीनेही प्रतिक्रिया दिली आहे

Updated: Sep 12, 2022, 08:48 PM IST
रिक्षामध्ये सायकल ठेवून मुंबईच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या या सेलिब्रिटीला ओळखलत का? title=

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मॉर्निंग वॉक आणि सायकल राईड किंवा जीम करणं पसंद करतात. अनेक सेलिब्रिटीही फिटनेसफ्रिक असल्याचे आपण पाहिलं असेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओ आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. 

अशाच एका फिटनेसफ्रिक सेलिब्रिटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा स्टार आपली सायकल रिक्षामध्ये ठेवून त्याच्या बाजूला बसलेला दिसत आहे. हा अभिनेता कोण आहे हे तुम्हाला ओळखता येईल का?

या सेलिब्रिटीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेता रिक्षाच्या आत सायकल घेऊन बसला आहे आणि स्वतः सीटवर बसलेला दिसत आहे. अभिनेत्याने गॉगल लावला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर हात आहे. तर दुसरीकडे रिक्षाचालक कॅमेरा पाहून हसताना दिसत आहे.

तर हा अभिनेता दुसरा कोणी नसून फरहान अख्तर (Farhan Akhtar)  आहे. फरहान अख्तरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. 'रविवारची सायकल राइड अपूर्ण राहिली कारण सायकलचा टायर पंक्चर झाला,' असे कॅप्शन फरहानने फोटो शेअर लिहिलं आहे. 

दरम्यान, फरहान अख्तरच्या या पोस्टवर त्याची बहीण झोया अख्तरची प्रतिक्रिया समोर आली आहे. कमेंट सेक्शनमध्ये झोयाने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. या फोटोवर बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टरनेही 'हा हा हा' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या दोघांशिवाय फरहान अख्तरच्या चाहत्यांनीही त्याच्या या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘भाग मिल्खा भाख’. तर आणखी एका यूजरने याला साहसी कृत्य म्हटलं आहे.