Rupali Ganguly Quit Anupama Serial : अनुपमा या शोच्या सुरुवातीपासूनच टीव्हीवर लोकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे, तिच्या अप्रतिम कथेने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलंय. लोकांना शोची कथा तसंच त्यातील पात्रे आवडली आहेत. हा शो सुरु होऊन तब्बल 4 वर्ष झाली आहेत. जरी अलीकडच्या काळात अनेक लोकांनी शो सोडला आहे. आता याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. असं म्हटलं जातं की, निर्माते शोच्या कलाकारांमध्ये बदल करणार आहेत, ज्यात रुपाली गांगुली या शोला अलविदा करार आहे.
अनुपमाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये रुपाली येत्या तीन महिन्यांत या शोला अलविदा करणार असल्याचे बोललं जात आहे. रुपाली हा शोचा सुरुवातीपासूनच महत्त्वाचा भाग आहे. अनुपमामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारे सुधांशू पांडे आणि गौरव खन्नाही आता या शोचा भाग नाहीत. या शोशी संबंधित बातम्यांमध्ये असं म्हटलं जात आहे की रुपालीने शो सोडल्यानंतर त्याची कथा पूर्णपणे बदलली जाणार आहे. शोबद्दल बोलायचं झालं तर, आता या शोमध्ये 15 वर्षांनंतरची कथा दाखवली जात आहे, ज्यामध्ये अनुपमाच्या पात्राचा स्क्रीन टाइम कमी करण्यात आला आहे. तसंच नवीन पात्रांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलंय. त्यामुळे रुपाली गांगुली आता शोमधून एक्झिट घेणार असं बोलं जात आहे. तर रुपाली गांगुलीने शो सोडला तर तेचे पात्र कोण साकारणार? हे पाहणे विशेष ठरणार आहे. मात्र अशी चर्चा रंगली आहे की, रुपाली गांगुली तीन महिन्यांत या शोचा निरोप घेणार आहे.
पिंकविलाच्या म्हणण्यानुसार, उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने, तिचे जाणे कदाचित नवीन नायकांमधील प्रेम त्रिकोणाच्या निर्मितीशी जुळेल. मात्र, निर्माते आणि अभिनेत्री यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र, या बातमीच्या सत्यतेबद्दल बोलायचं झालं तर अनुपमा यांच्या जवळच्या सूत्रांकडून TV9 डिजिटलला मिळालेल्या माहितीनुसार, ही बातमी पूर्णपणे बनावट असून त्यात कोणतेही तथ्य नाही. रुपालीने गेल्या चार वर्षांपासून अनुपमाची काळजी घेतली आहे आणि तिच्यामुळे शोचे रेटिंगही खूप चांगले आहे. सध्या शोच्या कथेत असा कोणताही बदल समोर आलेला नाही, ज्यामध्ये रुपाली शोमधून बाहेर पडल्याची चर्चा आहे. अभिनेत्रीबद्दल बोलायचं झालं तर तिने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अलीकडेच, अलीशा परवीनला देखील शोमधून रिप्लेस करण्यात आले होते, ती शोमध्ये राशीची भूमिका साकारत होती. अलिशाने रूपालीवर सेटवर गैरवर्तन केल्याचा आणि तिच्या वाढत्या स्टारडमबद्दल असुरक्षित असल्याचा आरोप केला. सुधांशूचे पात्रही अचानक बदलण्यात आले होते, त्यांनी नंतर सांगितलं की, शोमध्ये वनराजच्या पात्रासाठी काहीच उरले नाही. आता या बातमीत किती तथ्य आहे, हे वेळच सांगेल.