'आधी अंघोळीला जा', नवऱ्याचा अवतार पाहून आमिर खानच्या लेकीने केलं असं काही...; व्हिडीओ व्हायरल

Aamir khan daughter Ira Khan Wedding : इरा आणि नुपूर हे 5 जानेवारीला उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र मंडळी सहभागी होणार आहेत. तसेच खास बॉलिवूड कलाकारांसाठी मुंबईत एक सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Updated: Jan 4, 2024, 07:53 PM IST
'आधी अंघोळीला जा', नवऱ्याचा अवतार पाहून आमिर खानच्या लेकीने केलं असं काही...; व्हिडीओ व्हायरल title=

Aamir khan daughter Ira Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान लग्नबंधनात अडकली. इराने तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली. सध्या सोशल मीडियावर इरा आणि नुपूरच्या फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. आता नुकतंच त्यांच्या लग्नादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आमिर खानची लेक इरा आणि नुपूर शिखरेच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. इरा आणि नुपूर हे बुधवारी नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकले. यावेळी इराने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यात ती छान नववधूच्या रुपात दिसत होती. तर दुसरीकडे नवरा मुलगा मात्र शॉर्ट्स आणि सँडो घालून उपस्थित होता. त्यामुळे नुपूरला त्याच अवतारात लग्न करावे लागले. 

यानंतर इरा खान ही नुपूरवर भडकल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत इरा ही नुपूरला आधी अंघोळीला जा, असे सांगताना दिसत आहे. त्यावर नुपूरही होकार देतो आणि तिच्याकडे बघून जाऊ का असे विचारतो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

 

आमिरची लेक इराचा लग्नसोहळा तब्बल 10 दिवस चालणार आहे. त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना 3 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. इरा आणि नुपूर हे 5 जानेवारीला उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र मंडळी सहभागी होणार आहेत. त्यानंतर 13 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच खास बॉलिवूड कलाकारांसाठी 13 जानेवारीला मुंबईतील बीकेसीमध्ये एक सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड कलाकार, दाक्षिणात्य कलाकार, राजकीय नेते मंडळी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. 

दरम्यान इरा खान आणि नुपूर हे दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. इटलीमध्ये झालेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्येही तो सहभागी झाला होता. या स्पर्धेदरम्यान त्याने आयरासमोर गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं.  नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. अनेक कलाकार मंडळींना तो फिटनेस ट्रेनिंग देतो.