राजपथावरील जवानांची प्रात्यक्षिके बघून अमिताभ गहिवरले

भारतात आज सर्वत्र 69वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी परेड राजपथावर झाली. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 26, 2018, 01:23 PM IST
राजपथावरील जवानांची प्रात्यक्षिके बघून अमिताभ गहिवरले title=

मुंबई : भारतात आज सर्वत्र 69वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी परेड राजपथावर झाली. 

राजपथावर देशांची सार्वभौमिकता, सामूहिक शक्ती आणि सांस्कृतीक एकतेचे दर्शन घडते. हे सर्व पाहिल्यानंतर देशाबद्दलचा ऊर अभिमानाने भरुन येतो. मान अभिमानाने उंचावते. प्रजासत्ताक दिनानिमित्तची ही परेड पाहण्यासाठी अमिताभ बच्चनही गेले होते. या परेडमधील भारतीय जवानांनी सादर केलेली प्रात्यक्षिक पाहून अमिताभ यांचा ऊर अभिमानाने भरुन आला.

बिग बींनी याबाबत ट्विटही केले. ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनाची परेड पाहतोय. हा अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा जवानांची परेड सुरु होती तेव्हा डोळ्यात अक्षऱश: अश्रू तरळले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जेव्हा आम्ही दिल्लीत होतो तेव्हा सीट पकडण्यासाठी धावायचो. जय हिंद.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटर आपल्यासह मुलगा अभिषेक बच्चनचाही फोटो शेअर करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.