16 वर्षांनंतर 'भूतनाथ' मधील 'बंकू' आता कसा दिसतो एकदा पाहाच!

Bhootnath fame Banku asa Aman Siddiqui : 'भुतनाथ' या चित्रपटातील बंकू उर्फ अमन सिद्दीकी आज कसा दिसतो हे एकदा पाहाच...

दिक्षा पाटील | Updated: Feb 1, 2024, 04:05 PM IST
16 वर्षांनंतर 'भूतनाथ' मधील 'बंकू' आता कसा दिसतो एकदा पाहाच! title=
(Photo Credit : Social Media)

Bhootnath fame Banku asa Aman Siddiqui : 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'भूतनाथ' हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटातील लहाणमुलानं सगळ्यांची मने जिंकली. या चित्रपटात बंकू भैया ही भूमिका चाइल्ड आर्टिस्ट अभिनेता अमन सिद्दीकीनं साकारली होती. अमिताभ आणि अमन या दोघांमध्ये दाखवण्यात आलेली मस्ती सगळ्याच प्रेक्षकांना आवडली होती. या चित्रपटात त्यानं शाहरुख खान आणि जुही चावला यांच्यासोबत देखील स्क्रिन शेअर केली होती. मात्र, त्या चित्रपटानंतर अमननं फार काही काम केलं नाही. आता तो छोटा अमन खूप मोठा झाला आहे. 16 वर्षांनंतर अमन कसा दिसतो ते एकदा बघूया आणि तो आता काय करतो हे पण जाणून घेऊया.  खरंतर आता इतक्या वर्षांनी बंकूला ओळखनं देखील कठीण झालं आहे. 

अमन सोशल मीडिया अकाऊंटवर चांगलाच सक्रिय असतो. तर सोशल मीडियावर तो अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. काही काळापूर्वी त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही जुने फोटो पाहायला मिळतात. त्यातील सगळ्यात नवीन त्याची जी पोस्ट आहे त्यात अमनचा एक लहाणपणीचा फोटो आणि तर त्यानंतर त्यानं शूटमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूड कलाकारांसोबतच त्यानं अनेक दिग्गज क्रिकेटर्ससोबत देखील काम केलं आहे. अमनचं घारे डोळे आणि कुरळे केस सगळ्यांचे लक्ष वेधताना दिसतात. स्टारकिड म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या अमननं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत म्युजिकमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमनचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्याला पाहून हाच तो बंकू आहे का असं कोणालाही ओळखता येणार नाही. अमनला म्युजिकची खूप आवड आहे. तो आता फक्त एक अभिनेता नाही तर त्यासोबत एक स्टेज परफॉर्मर आणि म्युजिशियन देखील आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तो सेंट. झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे परफॉर्म करताना दिसला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : एका गोष्टीमुळे 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हातून निसटला शाहरुखसोबतचा चित्रपट

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमननं लहानपणी अनेक लोकप्रिय जाहिरातींमध्ये काम केलं आहे. अमननं सगळ्यात शेवटी शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं की बंकू? इतका मोठा कधी झाला? दुसरा नेटकरी म्हणाला, तू खरंच तो बंकू आहेस?