बॉबी देओलआधी 'या' अभिनेत्रीने केला होता डोक्यावर ग्लास ठेवून डान्स; जुना व्हिडिओ झाला व्हायरल

सिनेमा रिलीजच्या अगदी कमी वेळात बॉबीने सर्वांची मनं जिंकली होती. तर अभिनयासोबतच बॉबीचा 'जमाल कुडू' डान्सही खूप चर्चेत होता.

सायली कौलगेकर | Updated: May 6, 2024, 01:05 PM IST
बॉबी देओलआधी 'या' अभिनेत्रीने केला होता डोक्यावर ग्लास ठेवून डान्स; जुना व्हिडिओ झाला व्हायरल title=

Animal Jamal Kudu Song : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा सिनेमा 'एनिमल'ने रिलीजसोबतच बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले होते. एनिमलमध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदानाची एक्टिंगने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला होता. अशातच आता प्रत्येकाने एनिमलच्या दुसऱ्या पार्ट म्हणजेच  'एनिमल पार्क'च्या रिलीजची वाट पाहिली होती. सिनेमात बॉबीने खलनायकाच पात्र साकारलं होतं. 

सिनेमा रिलीजच्या अगदी कमी वेळात बॉबीने सर्वांची मनं जिंकली होती. तर अभिनयासोबतच बॉबीचा 'जमाल कुडू' डान्सही खूप चर्चेत होता. या गाण्याची डान्स स्टेपला आज प्रत्येकजण फॉलो करताना दिसतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, बॉबीच्या आधी जमाल कुडू गाण्याची डान्स स्टेप एक अभिनेत्रीने आपल्या सिनेमात वापरली होती. एनिमल रिलीजनंतर आता त्या अभिनेत्रीचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चला तर मग जाणून घेवून कोण आहे ती? 

बॉबी आधी या अभिनेत्रीने केला होता 'जमाल कुडू'ची हुक स्टेप
एनिमलमधील 'जमाल कुडू' गाण्यावर बॉबी देओलने आपल्या डोक्यावर ड्रिंकचा ग्लास ठेवून डान्स केला होता. जी स्टेप लोकांमध्ये ट्रेंण्ड बनली होती. लग्न, पार्टीच नव्हेतर एवॉर्ड शोपर्यंत स्टार्सला ही स्टेप करताना पाहिलं जात होतं. मात्र याआधी 70-80 च्या दशकात ही डान्स स्टेप याधीही केली गेली होती. आणि ही डान्स स्टेप करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा आहे. 35 वर्षांपूर्वी रेखाने  'बीवी हो तो ऐसी' ही डान्स स्टेप केली होती आणि अनेक वर्षांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओत रेखाही बॉबीप्रमाणेच ड्रिंकचा ग्लास डोक्यावर घेऊन नाचताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 'बीवी हो तो ऐसी' हा सिनेमा 1988 साली रिलीज झाला. या सिनेमात रेखा ने 'सासू जी तूने मेरी कदर न जानी' या गाण्यावर असा डान्स केला होता. समोर आलेल्या व्हिडीओत रेखा हिरव्या रंगाच्या  सिल्क सलवार-सूटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या सिनेमात रेखा व्यतिरीक्त सलमान खान कादर खान, फारुख शेख, असरानी आणि बिंदूसारखे दमदार कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.