Karan Kundrra आणि Anusha Dandekar चा ब्रेकअप, कुणीकडून विश्वासघात?

आमचे नाते पुढे नेण्याचा खूप प्रयत्न केला

Updated: Jan 12, 2022, 01:15 PM IST
 Karan Kundrra आणि Anusha Dandekar चा ब्रेकअप, कुणीकडून विश्वासघात? title=

मुंबई : मनोरंजन उद्योगात, सेलेब्स त्यांचे नातेसंबंध आणि ब्रेकअप या दोन्हीसाठी चर्चेत असतात. एकत्र काम करत असताना अनेकवेळा कलाकार एकमेकांसोबत मैत्री करतात. आणि मग त्यांची मैत्री बऱ्याचदा प्रेमात बदलते. काही सेलेब्स हे गुपित ठेवतात तर काही उघडपणे सर्वांना सांगतात. असंच एक जोडपे म्हणजे करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर.

करण आणि अनुषाचे नाते कोणापासून लपलेले नव्हते. दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते पण नंतर असे काही झाले की दोघे वेगळे झाले.

Anusha Dandekar Thought Karan Kundra Was Gay, He Gave Her Attitude Because  Of Rannvijay - Zee5 News

करण आणि अनुषा 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण आता हे जोडपे अशा प्रकारे वेगळे झाले की त्यांना एकमेकांचे तोंड पाहणेही आवडत नाही. करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर यांच्या ब्रेकअपचे कारण समोर आले आहे.

अनुषा आणि करणने लव्ह स्कूल हा रिअॅलिटी शो एकत्र होस्ट केला. रिपोर्ट्सनुसार, या शोमधून दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. या शोमध्ये स्पर्धकांना प्रेमाचा खरा अर्थ सांगताना दोघेही प्रेमात पडले. करण आणि अनुषाने आपले प्रेम कोणापासून लपवले नाही आणि दोघेही नेहमी एकत्र दिसले.

विभक्त झाल्यानंतर आरोप

करण आणि अनुषा लिव्ह-इनमध्ये राहू लागले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण ब्रेकअप झाल्यावर अनुषाने करणवर फसवणूकीचा आरोप केला. अनुषाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की तिची फसवणूक झाली आहे, तिच्यासोबत खोटं बोललं गेलं आहे. मी माफीची वाट पाहत होते पण तसे झाले नाही.

अनुषाच्या पोस्टनंतर करणने एका मुलाखतीत त्याच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. तो म्हणाला की, आम्ही आमचे नाते पुढे नेण्याचा खूप प्रयत्न केला पण तसे होऊ शकले नाही.