मुंबई : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. मुळात प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाची लोकप्रियता आहे. अशाच या कार्यक्रमात दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिनं मात्र असं वक्तव्य केलं, की सर्वांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या.
नुकतंच या कार्यक्रमामध्ये फराह खान आणि रवीना टंडन यांनी हजेरी लावली होती. यासंदर्भातील संपूर्ण भाग अद्यापही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही.
पण, प्रमोशनल व्हिडीओपासूनच या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
जिथं फराह खान आपल्या मुलाला संपत्तीतून बेदखल करण्याबाबत वक्तव्य करताना दिसत आहे.
बरं, यामागचं कारण ऐकून तुम्हीही विचारात पडाल. मुख्य म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की फराहनं कोणत्या गंभीर कारणासाठी मुलाला संपत्तीचा वाटा नाकारला आहे, तर तुम्ही चुकताय.
काय आहे त्यामागचं कारण ?
कपिलनं कार्यक्रमात आलेल्या फराहला तिच्या पायाला दुखापत कशी झाली, असा प्रश्न केला. ज्यावर उत्तर देत तिनं एक किस्सा सांगितला.
'खरंतर शिरीष मला स्विमिंग कॉस्च्यूममध्ये पाहून पडणं अपेक्षित होतं. पण झालं उलटं.
मीच स्विमींग पूलच्या पायऱ्यांवरून पडले. तेव्हा माझ्या दोन्ही मुली मदतीसाठी तेथे आल्या.
मुलगा मात्र तेव्हा मला पासवर्ड विचारत होता....वा रे लेका... मी म्हटलं तू तर संपत्तीतून आता गेलास... ', हा विनोदी किस्सा तिनं शेअर केला.
फराहनं ज्या अंदाजात गा किस्सा सांगितला ते पाहून तिथं सर्वांमध्येच एक हशा पिकला.