सुष्मिता आणि Aishwarya Rai सोबत मिस वर्ल्ड स्पर्धत असणारी 'ही' अभिनेत्री झाली भिक्षू

या अभिनेत्रीनं पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच काय तर तिचा पहिलाच चित्रपट हा अभिनेता अक्षय कुमारसोबत होता. सुष्मिता आणि ऐश्वर्यासोबत ही अभिनेत्री मिस इंडियाची फायनलिस्ट असणाऱ्यां पैकी एक होती. या अभिनेत्रीनं मालिकांमध्ये देखील काम केलं होतं. 

Updated: Mar 19, 2023, 12:56 PM IST
सुष्मिता आणि Aishwarya Rai सोबत मिस वर्ल्ड स्पर्धत असणारी 'ही' अभिनेत्री झाली भिक्षू title=

Barkha Madan Buddhist Monk : बॉलिवूड अभिनेत्रींना आपण पाहतो तर त्यावेळी अनेक मुलींना असे वाटते की आपण त्यांच्यासारखे दिसायला हवे. इतकंच काय तर जर मी अभिनेत्री झाली किंवा मला तिच्या इतकं फेम मिळालं तर मी काय काय करेन, असं प्रत्येक मुलगी बोलते. पण तुम्हाला माहितीये एका तरुणीला हे सगळं मिळालं असताा तिनं साधू होण्याचा निर्णय घेतला. हे ऐकूण तुम्हाला नक्कीच आश्चर्य झालं असेल की ही अभिनेत्री किंवा मॉडेल कोण असून शकते. तर सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्यासोबत 1994 सालच्या मिस इंडिया स्पर्धेची फायनलिस्ट ही अभिनेत्री होती. (Miss India Finalist) त्या अभिनेत्रीचं नाव बरखा मदान असं आहे. 

बरखा मदन (Barkha Madan) या अभिनेत्रीनं बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारच्या 1996 साली प्रदर्शित झालेल्या 'खिलाडियों का खिलाडी' या चित्रपटातून बरखानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली होती. हा चित्रपट त्या काळात चांगलाच गाजला होता. त्यानंतर बरखाला अनेक चित्रपटांसाठी ऑफर मिळू लागल्या होत्या. पण तिनं त्यावेळी एक-एक करून सगळ्या भूमिकांना नकार दिला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बरखानं त्यानंतर 'तेरा मेरा प्यार' (Tera Mera Pyaar) या पंजाबी चित्रपटात काम केले. तिचा हा चित्रपट देखील फ्लॉप झाला. त्यानंतर तिनं छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बरखानं 'न्याय' आणि '1857 क्रांती' या मालिकांमध्ये काम केले. बरखानं बॉलिवूडमध्ये काम मिळत नसताना दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळण्याचा विचार केला नाही. 

हेही वाचा : पहिल्या चित्रपटातून जिंकलं सगळ्यांच मन, यशाच्या शिखरावर असताना Tanushree Dutta झाली डिप्रेशनचा शिकार

मिस इंडिया झाली तर काय करणार? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1994 सालच्या मिस इंडिया स्पर्धे दरम्यान, बरखाला प्रश्न विचारण्यात आला होता की मिस इंडिया झालीस तर काय करशील? यावर उत्तर देत बरखा म्हणाली, मला गरजू मुलांना मदत आणि सेवा करायची आहे. तेव्हाही ती हे काम करत होती.दरम्यान, बरखानं अचानक भिक्षू होण्याचा निर्णय घेतला. आता बरखा बौद्ध भिक्षू झाली आहे. आता बरखाचं नाव ग्यालटेन सॅमटेन (Gyalten Samten) असे आहे. याच नावानं ती आता ओळखली जाते.