लस घेतल्यानंतरही बॉलिवूडचा 'हा' खलनायक कोरोनाच्या विळख्यात

कोरोना व्हायरसचं राज्य आता सर्वत्र झपाट्याने पसरत आहे. 

Updated: Apr 14, 2021, 11:54 AM IST
लस घेतल्यानंतरही बॉलिवूडचा 'हा' खलनायक कोरोनाच्या विळख्यात  title=

मुंबई : कोरोना व्हायरसचं राज्य आता सर्वत्र झपाट्याने पसरत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर काहींचा तर या धोकादायक विषाणूने जीव घेतला आहे. अशात बॉलिवूडचा खलनायक अभिनेता कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. लस घेतल्यानंतरही अभिनेता आशुतोष राणाला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. 

आशुतोष राणाने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'दुर्गासमान असलेल्या आपल्या शरीरामध्ये 9 द्वार असतात. द्वारात विराजमान असलेली परमचेतना, रक्षण करणाऱ्या शक्तीला दुर्गा म्हटलं जातं. आज भारतीय  नववर्षाची सुरूवात झाली. आजपासून नऊ दिवस दुर्गेचे पुजन केलं जातं.' असं लिहीलं आहे.

हमारा शरीर एक दुर्ग की भाँति होता है उसमें नौ द्वार होते हैं, उन नौ द्वारों के भीतर विराजमान परम चेतना, उनकी रक्षा करने...

Posted by Ashutosh Rana on Tuesday, April 13, 2021

'अशा मंगल दिवशी जर तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल माहिती मिळत असेल, तर फार चांगलं आहे. मला आजचं कळालं की मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मी तात्काळ या आजारातून  मुक्त होण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. मला विश्वास आहे, मी लवकरच बरा होईल.'

राणा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिल्यानंतर चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान बॉलिवूडमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता चित्रीकरण देखील थांबण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.