Malaika आणि Arjunने केला साखरपुडा? अंगठी पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

मलायकाने एक सोशल मीडियावर एक फोटो केला आहे. 

Updated: Apr 14, 2021, 10:21 AM IST
Malaika आणि Arjunने केला साखरपुडा? अंगठी पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा  title=

मुंबई : अभिनेत्री मलायका  अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांची जोडी फारचं प्रसिद्ध आहे.  मलायका-अर्जुनला मोस्ट रोमांटीक कपल म्हणून देखील ओळखलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतात. अशात मलायका-अर्जुन लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. याचदरम्यान मलायकाने फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने डायमंडची अंगठी घातली आहे. ज्यानंत चाहत्यांनी  साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

मलायकाने एक सोशल मीडियावर एक फोटो केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'अंगठी एखाद्या स्पप्नासारखी आहे. आनंद याठिकाणाहून सुरू होतो. जर तुम्ही तुमच्या प्रेमासाठी काही भेटवस्तू घेण्याच्या विचारात आहात, तर ही अंगठी उत्तम पर्याय आहे.' मलायकाचं हे कॅप्शन पाहून ती कोणत्यातरी ब्रांडचं प्रमोशन करत आहे, असं लक्षात येतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

फोटो आणि कॅप्शनसह तिने एका ब्रांडला देखील टॅग केलं आहे. पण मलायकाच्या हातातील फोटो पाहात अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सांगायचं झालं तर मलायका-अर्जुन प्रत्येक ठिकाणी एकत्र दिसतात. शिवाय सोशल मीडियावर दोघे एकमेकांसोबत फोटो देखील पोस्ट करत असतात. 

त्यांचं नातं प्रत्येकाला ठाऊक असल्यामुळे, मलायका-अर्जुन कधी लग्न करणार? या उत्तराची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. मलायका-अर्जुन यंदाच्या वर्षी सप्तपदी घेणार असं देखील सांगितलं जात आहे.