आमिर खानच्या लेकीनंतर 'या' दिग्गज अभिनेत्याच्या मुलीचं केळवण; #anandi म्हणून इन्स्टावर फोटो व्हायरल

Swanandi Tikekar Ashish Kulkarni: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णीच्या लग्नाची. नुकताच त्यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. आता त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. आता त्यांच्या केळवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 10, 2023, 01:44 PM IST
आमिर खानच्या लेकीनंतर 'या' दिग्गज अभिनेत्याच्या मुलीचं केळवण; #anandi म्हणून इन्स्टावर फोटो व्हायरल  title=
ashish kulkarni swanandi tikekar kelvan photos goes viral

Swanandi Tikekar Ashish Kulkarni: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या येऊ घातलेल्या लग्नाची. या महिन्यात बऱ्याच सेलिब्रेटींचे लग्न आहे. मराठीतले लोकप्रिय सेलिब्रेटी कपल अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नाची चर्चा आहे तर बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची लेक आयरा खान हिचाही लवकरच विवाहसोहळा संपन्न होणार आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या केळवणाचे सध्या फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी या केळवणात उखाणेही घेतले आहेत. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा आहे. त्यांचे व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची मुलगी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरच्या लग्नाची. काही दिवसांपुर्वी तिचा साखरपुडा संपन्न झाला आहे. संगीतकार आशीष कुलकर्णी याच्यासोबत तिचा विवाहसोहळा संपन्न होतो आहे. 

त्यामुळे आता त्यांच्या केळवणाचे फोटो हे व्हायरल झाले आहे. लग्न जवळ आलं की होणाऱ्या वधू वरांना त्यांचे नातेवाईक, आप्तीय आणि मित्रपरिवार हे केळवणासाठी बोलवतात. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी टीकेकर हिला केळवणासाठी बोलावले होते. यावेळी सुबोध भावे यांची पत्नी मंजिरी भावे देखील उपस्थित होती. तसेच त्यांचे मित्र-नातेवाईकही उपस्थित होते. यावेळी त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मध्यंतरी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या केळवणाचेही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रथमेश लघाटेला सरप्राईज केळवणही देण्यात आले होते. त्याचाही व्हिडीओही बराच चर्चेत होता. आता स्वानंदीच्या लग्नाची 'लगीनघाई' सुरू झाली आहे. 

हेही वाचा : सुहाना खानच्या एका ड्रेसची किंमत माहित आहे? लक्झरी कार विकत घ्याल

सुकन्या मोने आणि स्वानंदी टिकेकर यांनी एकत्र 'अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई' या मालिकेतून त्यांनी एकत्र काम केले होते. त्यामुळे त्यांचेही घट्ट बॉंण्डिंग आहे. सुकन्या यांच्यापासून स्वानंदी आणि आशीषच्या लग्नाला सुरूवात झाली आहे. यावेळी तिनं गोड कॅप्शनही लिहिलं आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वानंदीची आई आरती अंकलीकर-टिकेकर या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. तर तिचे वडील हे लोकप्रिय अभिनेते उदय टीकेकर आहते. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून पदार्पण केले. त्यातून तिनं अनेक नाटकं आणि चित्रपट आणि मालिकांतून कामं केली आहेत.