क्लिन चीट मिळाल्यानंतर Aryan Khan चा पुढचा प्लान काय?

आर्यनचा हा प्लान ठरलाच होती, तो फक्त क्लिन चीटच्या प्रतीक्षेत होता... पाहून तुम्हीही असंच म्हणाल   

Updated: May 28, 2022, 05:19 PM IST
क्लिन चीट मिळाल्यानंतर Aryan Khan चा पुढचा प्लान काय? title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. या बातमीमुळे आर्यनच्या कुटुंबात आनंदाची लाट पसरली आहे. शुक्रवारी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 6000 पानांचे आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये 14 आरोपींची नावे आहेत. त्याचवेळी आर्यन खानला पुराव्याअभावी क्लीन चिट देण्यात आली. 

आर्यन खान कामावर परतणार?
ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खान आपल्या कामावर परतण्याचा विचार करत आहे. काही काळापूर्वी ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आर्यन खान वेब सीरिजमध्ये काम करत असल्याचं समोर आलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यनला त्याचा पासपोर्ट परत मिळेल, जो ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर एनसीबीने जप्त केला होता.

दरम्यान ड्रग्स प्रकरणानंतर आर्यन यूएस ला जाणार आहे आणि तेथे तो या वेब सीरिजवर काम करण्यासाठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि लेखकांकडून मार्गदर्शन घेणार आहे.  असं देखील रिपोर्टमधून समोर आलं आहे.