हॉट नोरा 'या' सुपर हॉट अभिनेत्रीला देतेय डान्सचे धडे

 नोरा फतेही बॉलीवूडमधील सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक आहे. 

Updated: May 28, 2022, 04:53 PM IST
हॉट नोरा 'या' सुपर हॉट अभिनेत्रीला देतेय डान्सचे धडे title=

मुंबई : नोरा फतेही बॉलीवूडमधील सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक आहे. आपल्या नृत्य कौशल्यामुळे नोरा कायम चर्चेत असते. याशिवाय ती तिच्या अभिनय कौशल्यावरही काम करत असते. मात्र नोराने स्ट्रीट डान्सर 3डी, बाटला हाऊस, स्त्री यासह अनेक चित्रपटांमध्ये आपलं नृत्यकौशल्य दाखवून प्रेक्षकांना वेड लावलं. बॉलीवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी नोराने बराच काळ संघर्ष केला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की, ती दिशा पटानीची डान्स टीचर देखील आहे.

होय, नोराने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात लोकांना नृत्य शिकवण्याचं कामही केलं आहे आणि दिशा पटानी तिची विद्यार्थिनी आहे. दिशा आणि नोरा संघर्षाच्या काळापासूनच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर नोरासोबतचा सेल्फी शेअर करत दिशाने लिहिलं होतं की, बेस्ट टीचर गिफ्ट. या पोस्टला उत्तर देत नोराने लिहिलं की, बेबी दिशा पटानी इतक्या सुंदर सर्वोत्तम शिक्षक भेटवस्तूबद्दल धन्यवाद, मला तुझी नृत्य शिक्षिका म्हणून नेहमीच आनंद होईल. नोराने या पोस्टसोबत माय फेव्हरेट स्टुडंट आणि बेस्ट स्टुडंट असे हॅशटॅगही वापरले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नोरा सध्या किड्स डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने ज्युनियर्समध्ये जजची म्हणून दिसतेय. याचबरोबर तिच्याकडे अनेक चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओच्या ऑफर आहेत. दिशाबद्दल बोलायचं झालं तर ती, मोहित सूरीच्या आगामी 'एक व्हिलन 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया दिसणार आहेत. हा चित्रपट 8 जुलै 2022 रोजी रिलीज होणार आहे.

याशिवाय दिशा धर्मा प्रोडक्शनच्या 'योद्धा' या अॅक्शन ड्रामा चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशी खन्नासोबत दिसणार आहे. हा सिनेमा 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होईल.