Anu Aggarwal on Relationship With Mahesh Bhatt : 90 च्या दशकातील लोकप्रिय चित्रपटांची चर्चा सुरु झाली तर त्या चित्रपटांमध्ये ‘आशिकी’ या चित्रपटाचं देखील उल्लेख केला जातो. हा तो चित्रपट आहे, ज्यात दोन आउटसाइडर्स एका रात्रीत स्टार झाले. त्यात अनु अग्रवाल आणि राहुल रॉय यांची नावं आहेत. महेश भट्ट यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. पण दोघांना मिळालेली लोकप्रियता जास्त काळ टिकून राहिली नाही. अनु अग्रवालचं करिअर एका अपघातामुळे संपलं. ‘आशिकी’ च्या यशानंतर 22 वर्षांची असताना अनुचं नाव फिल्ममेकर आणि दिग्दर्शक महेश भट्टशी जोडण्यात आलं होतं. सगळीकडे त्यांच्या अफेअरची चर्चा रंगू लागली होती. 34 वर्षांनंतर पहिल्यांदा याविषयी अनु अग्रवालनं यावर वक्तव्य केलं आहे.
अनु अग्रवालच्या लूक्ससोबत तिच्या अभिनयाची देखील तितकीच चर्चा रंगायची. आशिकीच्या शूटिंग दरम्यान, दिग्दर्शक तिला वन टेक आर्टिस्ट बोलू लागले होते. अनुच्या अभिनयाच्या स्किलनं महेश भट्ट खूप इंप्रेस जाले होते. त्यानंतर अशी चर्चा रंगू लागली की विवाहीत महेश भट्ट यांच्यासोबत अफेअरमुळे तिला हा चित्रपट मिळाला. याविषयी आता अनु अग्रवालनं 'बॉलिवूड बबल'ला दिलेलया एका मुलाखतीत अनु अग्रवालनं यावर चर्चा केली. अनुशी जेव्हा याविषयी विचारण्यात आलं तेव्हा तिनं उत्तर दिलं की 'हे चुकीचं आहे, माझं महेश भट्टसोबत कोणतंही नातं नव्हतं. ते एक दिग्दर्शक म्हणून मला पसंत करायचे. त्यांना माझं काम आवडायचं. त्याशिवाय दुसरं काही नव्हतं. कोणाला माझ्याविषयी काही माहित नव्हतं.'
अनुनं पुढे सांगितलं की 'मी तरुण होते आणि मुंबईत एकटी राहत होते. माझे आई-वडील माझ्यासोबत नव्हते आणि मी एक मॉडेल होते. आशिकीमध्ये माझे सगळे शॉट हे वन-टेक होते. त्यामुळे महेश भट्ट मला 'वन टेक आर्टिस्ट’ बोलायचे. महेश भट्टसोबत अनु अग्रवालच्या अफेयरची चर्चा तेव्हा पहिल्यांदा सुरु झाली, जेव्हा त्यांना अनुचं काम पाहून आनंद झाला होता. ते नेहमी चित्रपटाच्या सेटवर अनुची स्तुती करायचे. ते पाहता सध्या अशी अफवाह पसरु लागली आहे की अनु अग्रवाल ही विवाहीत महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला.'
हेही वाचा : 'मी फिलर्स आणि बोटॉक्स...' प्लास्टिक सर्जरी करण्यावर 'धूम' अभिनेत्री स्पष्टच बोलली
अनुनं पुढे सांगितलं की 'मला असं वाटतं की अनेकांना हे आवडलं नव्हतं. तुम्हाला तर माहित आहे कसं होतं. दुसरे लोक जळू लागतात आणि त्यामुळे अनेक लोक अशी अफवाह पसरवु लागले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जी प्रतिक्रिया आम्हाला मिळाली, त्यावरून माझ्या लक्षात आलं की अफवाह पसरत आहेत. तो माझी इतकी स्तुती का करतो? त्यावेळी माझ्याकडे खूप काम होतं, त्यामुळे मी या सगळ्या अफवांकडे दुर्लक्ष केलं. एकटी राहणारी मी एकमेव तरुणी होती, जी वयाच्या 22 व्या वर्षी एकटी सगळं काही सांभाळत होती.'