'माझा एक्स परत येणार'; सुशांतसोबत ब्रेकअप केल्यानंतर विकीसमोर रडत होती अंकिता लोखंडे

Ankita Lokhande Missed Sushant after their Breakup : अंकिता लोखंडेनं 'बिग बॉस 17' मध्ये हा खुलासा केला आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा नवरा विकी जैन देखील आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 26, 2023, 11:41 AM IST
'माझा एक्स परत येणार'; सुशांतसोबत ब्रेकअप केल्यानंतर विकीसमोर रडत होती अंकिता लोखंडे  title=
(Photo Credit : Social Media)

Ankita Lokhande Missed Sushant after their Breakup : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेनं आता 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री घेतली आहे. तिच्यासोबत या चित्रपटात पती विकी कौशल देखील आहे. या शोमध्ये अंकिता आणि विकी यांच्यात गेम प्लॅनिंगवरून अनेकदा वाद होत असल्याचे पाहायला मिळते. अंकिताला बिग बॉसच्या घरात एकटे वाटत आहे. 

'टेली चक्कर'नं दिलेल्या माहितीनुसार, आता अंकिताला बिग बॉसच्या लाइव्ह फीडमध्ये नावेदसोबत बोलताना दिसली. अंकितानं नावेदला सांगितलं की दिवंगत अभिनेत्री सुशांत सिंह राजपुतसोबत तिचा ब्रेकअप झाल्यानंतर तिची कशी परिस्थिती झाली होती हे तिनं सांगितलं आहे. याविषयी बोलताना अंकिता म्हणाली की 'ब्रेकअपनंतर माझ्यासाठी मूव्हऑन करणं खूप कठीण झालं होतं. कारण हे अनेक वर्ष असलेलं रिलेशनशिप होतं. हे सगळं तेव्हा होतं जेव्हा एक व्यक्ती मुव्ह ऑन करते आणि दुसरी करू शकत नाही. या प्रसंगातून निघण्यासाठी मला जवळपास दीड-वर्ष लागले. मी मुव्ह ऑन करू शकत नव्हती, कारण दुसऱ्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याविषयी मी विचारही करू शकत नव्हते. हे खूप वाईट आणि शॉकिंग होतं. पण प्रेमावर विश्वास ठेवणं मी कधीच सोडलं नव्हतं. त्यातून मी बाहेर पडले आणि विकी माझ्या आयुष्यात आला.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अंकिता म्हणाली की, 'विकी माझा मित्र होता, पण मी त्याला कधीच त्या नजरेनं पाहिलं नव्हतं. मी विकीशी बोलायचे आणि त्यावेळी मी त्याला बोलायचे की मेरा एक्स परत येईल. मी त्याची प्रतिक्षा करेन. मला नाही माहित की हे सगळं कसं झालं, फक्त विकी माझ्या आयुष्यात आला आणि त्यानं थेट मला लग्नाची मागणी घातली, त्याचवेळी मला जाणवलं की हेच आहे. रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी मला वेळ लागला. असं नव्हतं की मी एका रिलेशनशिपमधून निघाली आणि दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये आली. त्यातून बाहेर पडायला मला वेळ लागला आणि विकी माझ्या आयुष्यात आल्यानंतर सगळंच बदललं.'

अंकिता आणि सुशांतचं रिलेशनशिप

अंकिता आणि सुशांत या दोघांची भेट पवित्र रिश्ता या मालिके दरम्यान झाली होती. या मालिके दरम्यान, त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते दोघं विभक्त झाले.