मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्यानंतर आता 'पवित्र रिश्ता' फेम अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अंकिताच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरूवात झाली आहे. शनिवारी अंकिताने विकीच्या नावाची मेहंदी काढली आहे. होणाऱ्या पत्नीच्या हातावरील मेहंदी पाहाण्यासाठी विकी आतूर होता.
मेहंदी लावत असताना पारंपारिक ड्रेसमध्ये अंकिता अत्यंत खूश दिसत आहे. त्याचवेळी, अंकिताच्या हातावर स्वतःच्या नावाची मेहंदी पाहून विकीलाही स्वत:ला थांबवता आले नाही. ढोल-ताशाच्या तालावर तो जोरदार नाचत आहे.
अंकिता लोखंडेच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर येताच आता चाहते तिला नव्या प्रवासाच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते आणि मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचे विधी गेल्या आठवड्यात सुरू झाले आहेत.
गेल्या महिन्याच्या अखेरीस, अंकिता लोखंडेने तिच्या इंडस्ट्रीतील सर्व मित्रांना पार्टी दिली. ज्यामध्ये सृष्टी रोडे, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर, रश्मी देसाई यांच्यासह अंकिताच्या अनेक मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या.