Amruta Fadnavis Dance: गाणं तेच डान्स स्टेप्स पण त्याच फक्त ड्रेस वेगळा... अमृता फडणवीस यांचे चाहत्यांना चॅलेंज

'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे'  हे पंजाबी पार्टी साँग नुकतचं प्रदर्शित झाले आहे. युट्यूबवर या गाण्याने धुमाकूळ घालत आहे.  गाणं तेच डान्स स्टेप्स पण त्याच फक्त वेगळा ड्रेस घालून अमृता यांनी चाहत्यांना या गाण्यावर इन्ट्राग्रामवर रिल बनवण्याचे चॅलेंज दिले आहे. 

Updated: Jan 9, 2023, 12:08 AM IST
Amruta Fadnavis Dance: गाणं तेच डान्स स्टेप्स पण त्याच फक्त ड्रेस वेगळा... अमृता फडणवीस यांचे चाहत्यांना चॅलेंज  title=

Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) याचं  'आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे'  हे पंजाबी पार्टी साँग नुकतचं प्रदर्शित झाले आहे. युट्यूबवर या गाण्याने धुमाकूळ घालत आहे.  गाणं तेच डान्स स्टेप्स पण त्याच फक्त वेगळा ड्रेस घालून अमृता यांनी चाहत्यांना या गाण्यावर इन्ट्राग्रामवर रिल बनवण्याचे चॅलेंज दिले आहे. 

6 जानेवारी रोजी अमृता फडणवीस यांचे हे नविन गाण प्रदर्शित झाले. गाण प्रदर्शित झाल्यापासून गाण्याला जवळपास कोटी  व्ह्यूज मिळाले आहेत. या नव्या गाण्यात अमृता यांनी गायनाबरोबर डान्सही केला आहे. याच गाण्यातील एका डान्स स्टेपची क्लिप सोशल सोशलमिडियावर शेअर केली आहे. अमृता यांनी आपल्या चाहत्यांना या गाण्यावर डान्स करण्याचे चॅलेंज दिले आहे.

"अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!" असे या गाण्याचे बोल आहेत. हे एक पार्टी साँग आहे. या गाण्यात अमृता यांनी दोन तीन प्रकारचे ड्रेस परिधान केले आहेत. गोल्डन आणि इंडो वेस्टर्न  ड्रेससह अमृता यांचा एकदम ग्लॅमरस लुक या गाण्यात पहायला मिळणार आहे.  विशेष म्हणजे अमृता यांनी हे गाण गायल असून या गाण्याच्या व्हिडिओ एल्बममध्ये त्यांनी हटके डान्स देखील केला आहे.

अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आणि आवड दोन्ही आहे. त्या लव्ह आणि पार्टी साँगसह वेगवेगळ्या विषयांवर गाणी बनवत असतात.  सामाजिक विषयांवर अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी सादर  केली आहेत. तसेच त्यांचे भक्तीगीतांचे अनेक व्हिडिओ एल्बम देखील प्रदर्शित झाले. मात्र, "अज मैं मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!" या गाण्यात अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या कलेसह त्यांचा नृताविष्कार देखील पहायला मिळाणार आहे.