Rohit Shetty Accident : अपघातानंतर रोहित शेट्टी सेटवर परतला; सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला व्हिडिओ

रोहित शेट्टीचा व्हिडिओ सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 

Updated: Jan 9, 2023, 01:35 PM IST
Rohit Shetty Accident : अपघातानंतर रोहित शेट्टी सेटवर परतला; सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला व्हिडिओ title=

Rohit Shetty Accident : नुकतंच शुटिंगदरम्यान रोहित शेट्टी यांना दुखापत (Rohit Shetty Injured) झाली असून त्यांना रुग्णालयात (Rohit Shetty hospitalised) दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनसुार एका कारचा सीन चित्रित करताना रोहित शेट्टी यांच्या हाताला दुखापत झाली, त्यानंतर त्यांना हैदराबादमधल्या कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

बातमी समजल्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि चाहते खूप नाराज झाले. या बातमीनंतर त्याच्या प्रत्येक चाहत्यांना दिग्दर्शकाची अवस्था जाणून घ्यायची इच्छा आहे. त्याचवेळी रोहित शेट्टीबद्दल अशी बातमी आली आहे की, तो आता ठीक आहे आणि तो सेटवर परतला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला व्हिडिओ
रोहित शेट्टीचा व्हिडिओ सिद्धार्थ मल्होत्राने (Siddharth Malhotra) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टीच्या हाताला पट्टी बांधलेली दिसत आहे पण त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल दिसत आहे. या स्मितहास्याने त्याच्या धाडसाचं कौतुक होत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रोहित शेट्टी सध्या एका वेब सीरिजवर काम करत असून या सीरिजचं नाव इंडियन पोलीस फोर्स असं आहे. रोहित शेट्टी पहिल्यांदाच वेब सीरिजचं दिग्दर्शन करतायत. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी यांच्यासारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजचा फर्स्ट लूकही जारी करण्यात आला आहे.

या वेब सीरिजचं शुटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे. या दरम्यानच रोहित शेट्टी यांच्या हाताला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार एक छोटीसी शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक असून तो कामावरही परतला आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' (circus) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर (Box Office) तो दणक्यात आपटला. त्यानंतर या वर्षी रोहित शेट्टी यांचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यात सिंघम 3, सूर्यवंशी 2 आण गोलमाल 5 सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय इंडिय पोलीस फोर्स ही वेब सीरिजही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.