Amitabh Bachchan Birthday : बॉलिवूड कलाकार आणि त्यांची लव्ह लाइफ ही कायम चर्चेली जाते. या बॉलीवूडमधील काही लव्ह स्टोरी तर एखाद्या अजरामर चित्रपटासारखी आहे. त्या कितीही जुन्या झाल्या तरी त्यावर आजही चर्चा होते. ते कलाकार प्रेमात होते, नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि ते पुढे वेगवेगळ्या मार्गाने गेले. अगदी त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीची एन्ट्रीही झाली. तरीदेखील बॉलिवूडमधील काही लव्ह स्टोरीबद्दल आजही बोलं जातं. त्यातील एक लव्ह स्टोरी आहे रेखा आणि अमिताभ बच्चन यांची. (Amitabh Bachchan should have married Rekha famous director revealed amitabh rekha love stor)
खरं तर हे प्रेम एकतर्फी होतं की दोघेंही एकमेकांवर खूप प्रेम करायचं याबद्दल क्वचितच कुणाला माहिती असेल. तसं तर यांच्या नात्याबद्दल सांगण्याचे अनेक किस्से आहेत. पण रेखा यांनी अमिताभ बच्चन हे आपल्याला आवडतात, असं अनेक वेळा उघडपणे कबूलही केलं आहे. पण मेगास्टार बिग बी यांनी या नात्यावर कधीही मौन सोडलं नाही. त्यांचं नातं आणि त्यानंतर जया बच्चन यांच्यामुळे ते नातं संपलं या सगळ्या कहाणी आहेत की त्यात काही सत्य हे सांगणं तसं कठीण आहे.
बिग बी यांच्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक यश चोप्रा रेखा आणि अमिताभ यांच्या नात्यावर अप्रत्यक्षपणे अनेक वेळा भाष्य केलं. तर दिग्दर्शक मुझफ्फर अली यांनी रेखा आणि बिग बी यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने आपलं मत मांडलं आहे. रेखासोबत चुकीचं झालं आणि अमिताभ यांनी रेखासोबत लग्न करायला हवं होतं, असं स्पष्ट मत मुझफ्फर अली यांनी मांडलं आहे.
गमन, अंजुमन आणि उमराव जान या सारखा नावाजलेल्या चित्रपटाचे मुझफ्फर अली हे दिग्दर्शक आहेत. उमराव जान या चित्रपटासाठी खु्द्द मुझफ्फर अली यांनी रेखाची निवड केली होती. या चित्रपटासाठी रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 1982 मधील या चित्रपटाने रेखा आणि बॉलिवडूसाठी एका उंचीवर नेऊन ठेवलं.
उमराव जान या चित्रपटाच्या निमित्ताने मुजफ्फर अली यांनी रेखासोबत भरपूर वेळ घालविला आहे. ते म्हणतात रेखा आज एक चालती फिरती लाश बनली आहे. यासाठी ते अमिताभ बच्चन यांना जबाबदार ठरवतात. दिग्दर्शकाने हे सांगितलं आहे की, उमराव जानच्या शूटिंगच्या वेळी अमिताभ दिल्लीतील सेटवर तासनतास बसायचे, हे सत्य आहे.
''जुस्तजू जिसकी थी उसको तो ना पाया हमने, इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने'' उमराव जानमधील हे प्रसिद्ध गाणं रेखा यांच्या आयुष्यावर तंतोतंत फिट बसतं. यासिन उस्मान यांनी रेखा कैसी पहेली जिंदगानी या रेखाच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकात याबद्दल सविस्तर लिहिण्यात आलं आहे.
रेखा जेव्हा कधी अमिताभ यांच्या बद्दल बोलायची किंवा हाक मारायची तेव्हा त्या आदराने इन्होंने किंवा उन्होंने असं म्हणायची. खरं अशी हाक एक विवाहित स्त्रीच आपल्या पतीला मारतात. मला वाटतं रेखा स्वत:ला विवाहित समज होती, असंही मुजफ्फर अली म्हणाले.
मुझफ्फर अली यांनी यासिर उस्मान यांना सांगितलं होतं की, रेखा अमिताभवर प्रेम करते आणि करत राहिल. रेखाला ओळख आणि नात्याला नाव हवं होतं. रेखा यांना अमिताभ यांच्यासोबत लग्न करायचं होतं. मुझफ्फर अली हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्धी आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुझफ्फर अली यांच्या विषयी अजून बोलायचं झालं तर तरे उत्तर प्रदेशातील लखनऊमधील आहे. शिवाय त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात लखनऊमधून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यांना 1978 मधील गमन या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर उमराव जाव या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तर मुझफ्फर अली यांच्या मुलगा शाद अली हा दिग्दर्शक आहे. त्याने अभिषेकचा बंटी और बबली या चित्रपटाचा दिग्दर्शित केला आहे.