मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रूग्णसंख्ये सोबतचं मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. अशात देशात ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीरचा तुटवडा भासत आहे. अशा महामाराीच्या परिस्थितीत अनेक सेलिब्रीटी मदतीसाठी पुढे धावून येत आहेत. सर्व सोलिब्रिटी मदतीसाठी पुढे येत आहेत. पण बच्चन कुटुंब मात्र कोणत्याही प्रकारची मदत करत असल्याची चर्चा रंगत आहे. या सर्व चर्चांना पुर्णविराम लावण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
बिग बी म्हणाले, 'बच्चन कुटुंब दान करतं. पण बोलून दाखवत नाहीं. आम्ही बोलण्यापेक्षा जास्त करण्यावर विश्वास ठेवतो.' सांगायचं झालं तर रविवारी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीच्या शीख गुरुद्वारामध्ये 2 कोटी आणि ऑक्सिजन सिलिंडर दान केले आहेत. शिवाय कोरोनमुळे आई-वडिलांचं निधन झालं अशा 2 मुलांना मी दत्तक घेतलं आहे. असं देखील त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून सांगितलं आहे.
बिग बी म्हणतात, 'बच्चन कुटुंबाने गेल्या काही वर्षांमध्ये दान केलं आहे. पण सोशल मीडियावर कधी देखावा केला नाही. मागील वर्षात कोरोनादरम्यान शेतकऱ्याच्या कर्जाची परतफेड, त्याशिवाय 5 हजार लोकांना 1 महिन्यापर्यंत दोन वेळेचं जेवण. अत्यावश्यक सेवेतील हजारो कर्मचाऱ्यांना मास्क पीपीई किटचं वाटपं.' या सर्व गोष्टींचा खुलासा बिग बींनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून केला आहे.
बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, 'यूपी आणि बिहारमधील परप्रांतीय कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी 30 बस बूक केल्या होत्या. मुंबई ते यूपी कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी पूर्ण ट्रेन बूक केली ज्यामुळे 2 हजार 800 कामगार त्यांच्या घरी पोहोचू शकले. जेव्हा राज्याने रेल्वे सेवा बंद केली, तेव्हा इंडिगो एअरलाइन्सची तीन विमाने बुक केली आणि 180 स्थलांतरितांना यूपी, बिहार, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचवलं.'
शिवाय कोरोनमुळे आई-वडिलांचं निधन झालं अशा 2 मुलांना मी दत्तक घेतलं आहे. त्यांना हैदराबादच्या आश्रम शाळेत ठेवण्यात येईल. त्यांचा 10 वी पर्यंत सर्व खर्च बिग बी करणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी देखील आमच्या परीने मदत करू असं देखील बिग बी म्हणाले.