बॉलिवूडचं ब्रह्मास्र, आलिया-रणबीरसोबत 'बीग बीं'ची एन्ट्री

या सिनेमाच्या निमित्तानं आलिया पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे

Updated: Jun 2, 2018, 09:49 PM IST
बॉलिवूडचं ब्रह्मास्र, आलिया-रणबीरसोबत 'बीग बीं'ची एन्ट्री title=

मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा सिनेमा 'ब्रह्मास्र'मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचं शुटिंग अद्याप सुरूही झालेलं नाही... पण, त्यापूर्वीच रणबीर आलियाच्या जोडीच्या हेडलाईन्स झळकू लागल्यात. आता या जोडीसोबत बॉलिवूडचा महानायकही दिसू लागलाय. होय, बीग बी अमिताभ बच्चन यांनीही आता रणबीर-आलियाच्या जोडीसोबत हजेरी लावणं सुरू केलंय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत सिनेमा 'ब्रह्मस्र'च्या पुढच्या शेड्युलसाठी अमिताभ बच्चन यांनी शुटिंग सुरू केलीय.

अमिताभ यांनी शुक्रवारी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर रणबीर, आलिया आणि सिनेदिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्यासोबत आपला फोटो शेअर केलाय. 'आम्ही ब्रह्मस्रची तयारी सुरू केलीय. अयान, रणबीर, आलिया सर्व मला सोडू... मी दात साफ करण्याचा प्रचार सुरू केलाय' 

या सिनेमाच्या निमित्तानं आलिया पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे... आणि यासाठी ती खूप उत्साहितही आहे. 

ब्रह्मास्र हा एक सीरिज सिनेमा असेल. यामध्ये तीन सिनेमे असतील. उल्लेखनीय म्हणजे या सिनेमातून टीव्ही अभिनेत्री मौनी रायदेखील आपल्या बॉलिवूडचा प्रवास सुरू करणार आहे.