बोनी कपूरने शेअर केला श्रीदेवीच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ

 बोनी कपूरने श्रीदेवीच्या ट्विटर अकाऊंटवरुन दुबईतील 'त्या' लग्नाचा व्हिडिओ शेअर केलाय.

Updated: Jun 2, 2018, 08:24 PM IST
बोनी कपूरने शेअर केला श्रीदेवीच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ title=

मुंबई : आपल्या भाच्याच्या लग्नासाठी दुबईत गेलेली श्रीदेवी पुन्हा परतलीच नाही. या लग्नानंतर तिथल्या हॉटेलमध्ये काही दिवस थांबण्याच तिनं ठरवलं होतं. या हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. तिच्या अशा अचानक जाण्याने देशभरात हळहळ व्यक्त केली गेली. आज श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या लग्नाला २२ वर्षे पूर्ण झाली. यावेळी बोनी कपूरने श्रीदेवीच्या ट्विटर अकाऊंटवरुन दुबईतील 'त्या' लग्नाचा व्हिडिओ शेअर केलाय. या लग्नामध्ये श्रीदेवी आपला पती आणि छोटी मुलगी खुशी सोबत गेली होती. पहिल्या सिनेमाच्या शुटींगमुळे मोठी मुलगी जान्हवीला या लग्नात येता आल नव्हतं.

आठवणींना उजाळा  

काही वेळापूर्वी बोनी कपूरने ट्विटरवर लग्नातील श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला. या लग्नात सोनम कपूर आणि आनंद आहूजादेखील गेले होते. श्रीदेवी आनंद आहूजासोबत गळाभेट करताना दिसत आहे. आपल्या परिवारासोबत हसत खेळत, सगळीकडे सहभागी होताना ती दिसतेय. लग्नानंतर इथल्या हॉटेलमध्ये ती काही वेळ थांबली. आपल्या मुलींसाठी तिला काही खरेदी करायची होती. पण याच हॉटेलच्या खोलीत हिंदी सिनेमातील पहिल्या सुपरस्टारचं निधन झालं.