कोरोनावर यशस्वी मात करून आलेले बिग बी चाहत्यावर भडकले

का भडकले अमिताभ बच्चन 

Updated: Aug 4, 2020, 04:48 PM IST
कोरोनावर यशस्वी मात करून आलेले बिग बी चाहत्यावर भडकले  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुपरस्टार अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर ऍक्टिव असतात. ट्विटर आणि ब्लॉगच्या माध्यमातून ते आपली मत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. सोशल मीडियावरून बिग बींना देखील चांगल प्रेम मिळत असतात. पण याबरोबरच त्यांना टिकेला देखील सामोरं जावं लागतं. मात्र शांत राहतील ते शहनशाह कोणते, महानायक अशांना देखील खूप चांगल उत्तर दिलं आहे. 

आता महानायक कोरोनावर मात करून परतल्यावर एका युझरने त्यांना वेगळाच प्रश्न विचारला त्यावर बिग बींनी सडेतोड उत्तर दिलं. अमूलने पोस्टरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांना कोरोनावर मात करून आल्यामुळे शुभेच्छा दिल्या. अमिताभ यांनी अमूलचं पोस्टर शेअर करून आभार व्यक्त केले. अनेक वर्ष अमूल सन्मानित करत आहेत. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला 'अमूल्य' बनवलं. 

याच दरम्यान एका युझरने जाहिरातीवर म्हटलं की,'कमीत कमी रुपयात थोडी अमुल्य बनले असाल. याकरता काही रक्कम आकारली असेल. दरवर्षी ही रक्कम वाढली असेल.' अमिताभ युझरच्या बोलण्यावर रागावले. या युझरला उत्तर देताना बिग बी म्हणाले की, सत्य माहित नसेल तर बोलू नये'. 'खूप मोठा गैरसमज आहे. जर खरं माहित नसेल तर स्वच्छ तोंड स्वच्छच ठेवावं. नाही तर ते तुमच्यावर येऊन कोसळेल. जसं आता झालं. '