Oops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video

Allu Arjun Pushpa 2 Dialogue Leak Video: अल्लू अर्जूनचे Allu Arjun Leak Video आपण सर्वच जण फॅन्स आहोत तेव्हा त्याच्या चित्रपटांची आपल्यालाही कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच आता त्यांच्या पुष्पा 2 या चित्रपटाची सर्वंच जण आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परंतु या चित्रपटातील एक डायलॉग खुद्द अल्लू अर्जूनकडूनच लीक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 22, 2023, 01:45 PM IST
Oops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video title=
July 22, 2023 | Oops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video | allu arjun recites a line of dialogue from pushpa the rule watch the video fans go wild

Allu Arjun Pushpa 2 Dialogue Leak Video: अल्लू अर्जूनच्या सिनेमांची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यातून त्याच्या 'पुष्पा 2' ची तर सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दोन वर्षांपुर्वी आलेल्या पुष्पानं तर अक्षरक्ष: लोकांना वेड लावले होते. त्यामुळे दुसऱ्या भागात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे यासाठी सगळेच उत्सुक आहेत. जेव्हा पुष्पाचा पहिला भाग झाला होता तेव्हा 'फ्लावर नहीं फायर हैं हम' हा डायलॉग कोण फेमस झाला होता. हा डायलॉग पाठ असल्याप्रमाणे लोकं भडभडा बोलत होते. आता दुसऱ्या पुष्पाच्या भागातही काहीतरी मस्त डायलॉग असेलच अशीच अपेक्षा प्रेक्षकांना आहे. परंतु चित्रपट येण्यापुर्वीच हा चित्रपटातील पुष्पाचा डायलॉग लीक झाला असल्याची बातमी आता समोर येते आहे. सध्या याचा एक व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे अल्लू अर्जूननं स्वत:ची आणि निर्मात्यांची गोची केली आहे का? नक्की काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया. 

अल्लू अर्जून हा आपल्या चाहत्यांना कायमच सरप्राईज करत असतो. त्यातून त्याच्या हटके स्टाईलनं तो प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असतो. परंतु आता आपल्याच चित्रपटातील डायलॉग लीक केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली असून चाहते त्याच्यावर भडकले आहे. त्यातून सध्या सोशल मीडियावर अल्लू अर्जूनच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता या लीक व्हिडीओचा त्याच्या चित्रपटावर परिणाम होणार का? अशीही काही लोकं चर्चा करताना दिसत आहेत परंतु या चित्रपटाला या लीक व्हिडीओचा काहीही परिणाम होणार नाही अशीही चर्चा आहे. कारण डायलॉग लीक झाला आहे म्हणजे अख्खा चित्रपट लीक झाला आहे असं नाही. त्यातून यावेळी तर त्याच्या नेटकरी मात्र भडकले आहे. 

हेही वाचा - डोळयासमोर अपघात मग नैराश्य अन् दारू... रोहित शेट्टीच्या वडिलांसोबत असं काय घडलं होतं?

सध्या बेबी या चित्रपटाच्या निमित्तानं अल्लू अर्जून स्टेजवर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याला त्याच्या आगामी 'पुष्पा 2' या चित्रपटाबद्दल काहीतरी बोलायला सांगितले होते. तेवढ्यात तो म्हणाला की, ''ईदंथा जरीगेदी ओकाटे नियम मीडा जरूगुतानादडी, 'पुष्पा' गाडी नियम'' त्यामुळे त्याच्या या संवादावर उपस्थितांनी जोरादार टाळ्या वाजवल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या त्याचा हा व्हिडीओ इन्टाग्रामवर @pushpamovie या पेजनं शेअर केला आहे. ज्यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''Okkate RULE... Adhi Pushpa Gadi RULE #pushpa #pushpa2therule''