अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार, मानधन वाद

बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ९१ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2017, 11:47 PM IST
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार, मानधन वाद title=

पुणे : बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ९१ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या लेखक साहित्यिकांनी आपल्या मानधनाचा त्याग करावा असं आवाहन, संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या मराठी वाड्मय परिषदेनं  केलाय. 

तसंच प्रवास खर्चही स्वत:च उचलावा असंही सुचवलंय. यावर मानधनाचा त्याग करण्याची सुरुवात साहित्य महामंडळापासून व्हावी असं आवाहन महामंडळाच्या माजी कोषाध्यक्षांनी केलंय. 

दुसरीकडे महाराष्ट्र साहित्य परिषदेने या आवाहनाला विरोध केलाय. मानधनाला कात्री लावण्या ऐवजी  राज्य सरकारकडून  मिळणारं २५ लाखांचं मानधन वाढवण्याची मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेनं केलीय. 

त्याचवेळी साहित्य संमेलनासाठी प्रायोजक न मिळण्याइतके वाईट दिवस आले आहेत का अशी टीका  कवी अशोक नायगावकर यांनी यावर केली आहे. त्याचवेळी गरज नाही अशा साहित्यिकांनी मानधनाचा त्याग करायचं आवाहनही त्यांनी केले आहे.