'मिशन मंगल' चित्रपटाचा आणखी एक धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

'मिशन मंगल' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच...

Updated: Aug 8, 2019, 02:11 PM IST
'मिशन मंगल' चित्रपटाचा आणखी एक धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'मिशन मंगल' चित्रपटाचा आणखी एक धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. संपूर्ण देशाने पाहिलेलं एक स्वप्न ते पूर्ण होईपर्यंत आणि हे स्वप्न पूर्ण होताना केलेल्या संघर्षाची कहाणी या ट्रेलरमधून समोर येत आहे.

ट्रेलर अतिशय सकारात्मक उर्जा देणारा आहे. इतिहासच्या पानांत सुवर्णाक्षरात नोंद झालेल्या देशाचा अंतराळ प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 

चित्रपटात अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हरि, नित्या मेनन भूमिका साकारणार आहे. याआधीदेखील 'मिशन मंगल'चा एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलराला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. 

अब अक्षय की टीम भरेगी ऊंची उड़ान, इसरो ने 'मिशन मंगल' टीम से कहा- 'गुड लक'

'मिशन मंगल' चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ति यांनी केलं आहे. चित्रपटात अक्षय कुमार संशोधक राकेश धवन या मिशनच्या प्रमुखाची भूमिका साकारत आहे. १५ ऑगस्ट रोजी 'मिशन मंगल' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.