102 नॉट आऊट : 'बडुम्बा' गाण्यात बीग बी - ऋषी कपूर यांची जुगलबंदी

खुद्द अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनीच हे गाणं गायलंय... आणि हे दोघं या गाण्यात 'झुम्बा' डान्स करतानाही दिसणार आहेत.

Updated: Apr 19, 2018, 05:42 PM IST
102 नॉट आऊट : 'बडुम्बा' गाण्यात बीग बी - ऋषी कपूर यांची जुगलबंदी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर दीर्घकाळानंतर एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दोघंही लवकरच प्रदर्शित होणाऱ्या '102 नॉट आऊट' या सिनेमात पिता - पुत्राच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन 102 वर्षांच्या पित्याच्या भूमिकेत दिसतील. तर त्यांचा मुलगा म्हणजेच ऋषी कपूर 75 वर्षीय म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात बीग बी यांची भूमिका मस्तीखोर पित्याची दिसतेय. नुकतंच या सिनेमातील 'बडुम्बा' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. या गाण्यात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जुगलबंदी प्रेक्षकांना पसंतीस पडतेय. 

उल्लेखनीय म्हणजे, खुद्द अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनीच हे गाणं गायलंय... आणि हे दोघं या गाण्यात 'झुम्बा' डान्स करतानाही दिसणार आहेत. 

  
सिनेमाचं दिग्दर्शन 'ओ माय गॉड' सिनेमाचं दिग्दर्शन केलेल्या उमेश शुक्ला यांनी केलंय. तर दुसरीकडे बीग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. दोघांनी यापूर्वी 'अमर अकबर अॅन्थनी' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. अमिताभ आणि ऋषी कपूर यांचा हा सिनेमा येत्या 4 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.