ऐश्वर्यानं बिग बींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; आराध्यासोबतचा फोटो पाहताच नेटकरी म्हणाले, 'तुझ्या सासरच्यांना...'

Aishwarya Rai Wish Amitabh Bachchan on his Birthday :  ऐश्वर्या रायनं अमिताभ यांच्यासाठी वाढदिवसासाठी शेअर केली खास पोस्ट... 

दिक्षा पाटील | Updated: Oct 12, 2024, 02:17 PM IST
ऐश्वर्यानं बिग बींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; आराध्यासोबतचा फोटो पाहताच नेटकरी म्हणाले, 'तुझ्या सासरच्यांना...'  title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Rai Wish Amitabh Bachchan on his Birthday : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं काल सासरे अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. लक्षवेधी गोष्ट म्हणजे ऐश्वर्यानं ही पोस्ट त्यांच्या वाढदिवस संपता संपता दिवसाच्या शेवटी केली. त्यातही जवळपास 6 महिन्यांनंतर ऐश्वर्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. इतक्या काळानंतर सोशल मीडियावर ऐश्वर्यानं पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. अमिताभ यांनी काल 11 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचा 82वा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्तानं चित्रपटसृष्टीतील सगळ्या सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, ऐश्वर्याच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

ऐश्वर्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ऐश्वर्यानं अमिताभ यांचा आराध्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. खरंतर हा फोटो आराध्याचा बालपणीचा आहे. अमिताभ यांनी आराध्याला मिठी मारली आहे. हा फोटो शेअर करत ऐश्वर्यानं कॅप्शन दिलं की वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा-आजोबा. देव नेहमीच तुमच्यासोबत राहो. ऐश्वर्यानं शेअर केलेला हा फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्याच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चांमध्ये ऐश्वर्याच्या या पोस्टनं सगळ्यांचं तोंड बंद केलं आहे. मात्र, असं असलं तरी देखील अशात काही चाहत्यांनी आता तिला तिचे फोटो शेअर करण्याची विनंती केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : आधी 'बिग बॉस' जिंकला अन् आता लॉटरीत घर लागलं... किंमत ऐकून व्हाल थक्क! शिव ठाकरेचं नशीब जोरावर

ऐश्वर्यानं शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'बरेच लोक बोलत होते की त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी हे काही न बोलता देण्यात आलेलं उत्तर आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ऐश इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत जा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आम्हाला तुला देखील पाहायचं आहे. तुझे फोटो देखील शेअर करत रहा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ऐश्वर्या तू खूप चांगली महिला आहे. तुझ्यात चांगले संस्कार आहेत नाही तर तुझ्या सासरच्यांना जो अॅटिट्यूड आहे. कोण या सगळ्या गोष्टी सहन करतं पण तू खूप चांगली महिला आहे.'