वैदही परशुरामी, सुबोध भावे आणि सुमीत राघवणचा 'संगीत मानापमान' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Subodh Bhave, Sumeet Raghvan, Vaidehi Parashurami Movie Sangeet Manapmaan: नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज...!

दिक्षा पाटील | Updated: Oct 12, 2024, 01:27 PM IST
वैदही परशुरामी, सुबोध भावे आणि सुमीत राघवणचा 'संगीत मानापमान' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित title=
(Photo Credit : Social Media)

Subodh Bhave, Sumeet Raghvan, Vaidehi Parashurami Movie Sangeet Manapmaan: लोकप्रिय मराठमोळा अभिनेता सुबोध भावेचा पहिला पोस्टर जेव्हा रिलीज झाला तेव्हाच या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्याचा हा संगीतमय चित्रपट 'संगीत मानापमान' ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. तर आज विजयादशमीच्या निमित्तानं या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करत एक पोस्ट शेअर केली आहे. 

सुबोध भावेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. मोशन पोस्टरमध्ये सगळ्यात आधी अभिनेता सुमीत राघवन दिसतोय. सुमीत राघवनचा पारंपरिक पोशाखात दिसत आहे. त्यानंतर सुबोध भावे एका क्षत्रियाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यानंतर वैदही परशुरामीचं नऊवारीतील विलोभनीय सौंदर्य आणि मराठमोळा साज दिसतोय. प्रेम, वीरता, शौर्य यांची गुंफण असलेले संगीत मानापमान नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची अविस्मरणीय भेट ठरणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हे मोशन पोस्टर शेअर कर सुबोध भावेनं कॅप्शन दिलं की "संगीतमय चित्रपट हा माझ्या आवडीचा विषय. 'कट्यार' वर तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि आपल्याच अभिजात संगीताला आपलेसे करून घेतले. मराठी भाषेमध्ये परिकथा सादर करावी हा विचार मनात आला आणि त्या शक्यता असलेले 'मानापमान' हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटक वाचनात आले. 'संगीत मानापमान' हा चित्रपट 'मानापमान' या नाटकावरून प्रेरणा घेऊन बनवलेला चित्रपट आहे. गेली पाच वर्षे मानापमानचा संपूर्ण संघ मनापासून मेहेनत घेत होता. जिओ स्टुडिओज, ज्योती देशपांडे आणि सुनील फडतरे यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य नव्हत. आता आम्ही 'सीमोल्लंघन' करायला सज्ज आहोत. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संगीत चित्रपटाच्या ऐतिहासिक अध्यायाचा आरंभ! एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट 'संगीत मानापमान!' 10 जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!"

या चित्रपटाविषयी बोलताना सुबोध भावे म्हणाला, "संगीत मानापमान या मराठीतल्या एका अत्यंत अभिजात अशा नाट्यकृती वरती काम करायला मिळणं हे खरोखर भाग्याची गोष्ट आहे. बालगंधर्व चित्रपटात बालगंधर्वची भूमिका करत असताना मानापमान या नाटकाशी संबंध आला, पण कधी तरी आपण त्याच्यावरती सिनेमा करू असा वाटलं ही नव्हतं. पण मधल्या काळात कट्यार नंतर नवीन चित्रपटाची आखणी करताना सगळ्यात भावलं ते म्हणजे मानापमानची प्रेम कथा तसेच गोविंदराव टेंबेंसारख्या दिग्गज अशा संगीतकारानं संगीतबद्ध केलेली गाणी ज्याची इतक्या वर्षानंतर ही गोडी तशीच आहे. बालगंधर्व असतील केशवराव भोसले असतील, दीनानाथ मंगेशकर असतील अशा दिग्गज नेत्यांचा स्पर्श, खडीलकरांची लेखनी असं एक वेग वेगळ्या अंगाने नटलेल्या नाटकावरून प्रेरित असा चित्रपट घडवताना तितक्याच तोलामोलाची मंडळी आजूबाजूला हवी होती. जिओ स्टुडिओजची भक्कम साथ, कट्यार आणि काशिनाथच्या वेळेस जी माझ्यासोबत टेक्निकल टीम होती ती ही तितक्याच प्रमाणे माझ्या सोबत उभी राहिली. सुमित राघवन, वैदेही आणि बरेच कलावंत आहेत ज्यांची नावं लवकरच तुमच्यासमोर येतील त्यांचा माझ्यावरचा विश्वास. मला असं वाटतं की हा चित्रपट फक्त सुबोध भावेचा नसून संपूर्ण टीमचा आहे आणि नवीन वर्षाची आमच्या संगीत मानापमान टीम तर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना ही संगीतमय प्रेम कथाभेट असणार आहे.

हेही वाचा : आधी 'बिग बॉस' जिंकला अन् आता लॉटरीत घर लागलं... किंमत ऐकून व्हाल थक्क! शिव ठाकरेचं नशीब जोरावर

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण तांत्रिक टीम या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र येत आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्तावचं म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर -एहसान - लॉय यांनी या चित्रपटाला संगीतबद्ध केलं आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे निर्मित, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, 'संगीत मानापमान' या संगीतमय चित्रपटात वैदेही परशुरामी, सुमित राघवनसोबत आणखी काही दिग्गज कलाकार असणार आहेत. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे.