Aishwarya Rai ने 'त्या' रात्रीसाठी घेतले 10 कोटी? अभिनेत्रीची बदनामी झाल्यानंतर...

Aishwarya Rai ने एका रात्रीसाठी घेतले 10 कोटी? 'या' घटनेमुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात    

Updated: Oct 1, 2022, 10:43 AM IST
Aishwarya Rai ने 'त्या' रात्रीसाठी घेतले 10 कोटी? अभिनेत्रीची बदनामी झाल्यानंतर...

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या सौंदर्यावर घायाळ होवून चाहत्यांनी ऐश्वर्याला डोक्यावर तर घेतलं, पण ऐश्वर्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरली. एवढंच नाही तर ऐश्वर्या अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. काही वर्षांपूर्वी असंच एक प्रकरण समोर आलं होतं, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, ऐश्वर्या रायने पाकिस्तानमधील एका गुप्त व्हीआयपी पार्टीत एका रात्रीसाठी परफॉर्म केलं होतं आणि त्यासाठी तिला 10 कोटी रुपये मिळाले होते.

ही घटना आहे 2008 ची. त्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी होते (Former Pakistan President Asif Ali Zardari). झरदारी ऐश्वर्याचे मोठे चाहते होते, असं देखील म्हटलं जातं. झरदारी यांनी ऐश्वर्या रायला त्यांच्या देशात परफॉर्म करण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. 

रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक (Political analyst of Pakistan) डॉ. शाहिद मसूद यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्यांनी ऐश्वर्यावर असे गंभीर आरोप केले होते.

मसूद यांनी आपल्या व्हिडीओमध्ये झरदारी यांच्या पार्टीत अनेक प्रसिद्ध लोक आल्याचं सांगितलं होतं. ऐश्वर्याचा डान्स परफॉर्मन्स पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात झाला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.  ( aishwarya rai movies)

दरम्यान, एका कार्यक्रमाचं होस्ट करत असताना मसूद यांनी ऐश्वर्याच्या या घटनेचा उल्लेख केला होता. ऐश्वर्याने त्या रात्री अशा कोणत्याही गुप्त पार्टीत परफॉर्म केले याचे कोणतेही पुरावे किंवा साक्षीदार नाहीत.  (aishwarya rai net worth in rupees 2022)

पण झरदारी यांच्या जवळच्या व्यक्तीने मसूद यांनी याबाबतची माहिती पाठवली होती, असे सांगितले जाते. जेव्हा ही बातमी मीडियात लीक झाली तेव्हा ऐश्वर्या राय चांगलीच संतापली होती. ही बातमी खरी की खोटी याचा पुरावा अद्यापही मिळालेला नाही. पण या बातमीने ऐश्वर्याची खूप बदनामी झाली.