हृतिक आणि सैफच्या यशात 'या' गोष्टीचा मोलाचा वाटा..., दोघांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ...

जाणून घ्या, चित्रपटाचं First Day Box Office Collection 

Updated: Oct 1, 2022, 10:34 AM IST
हृतिक आणि सैफच्या यशात 'या' गोष्टीचा मोलाचा वाटा..., दोघांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ...

मुंबई : 'विक्रम वेधा'चा (Vikram Vedha) ट्रेलर पाहून प्रेक्षकांना वेड लागलं होतं. ते पाहता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) या चित्रपटातील दोन मुख्य अभिनेते आहेत. आता बॉक्स ऑफिसवर 'विक्रम वेधा'च्या ओपनिंग कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. चित्रपटाची सुरुवात अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. मात्र, प्रेक्षकांनी चित्रपटाचे रिव्ह्यू खूप चांगले दिले आहेत. शनिवारी 'विक्रम वेधा'ची झालेली एडव्हान्स बुकिंग पाहता प्रेक्षक चित्रपटांची प्रतिक्षा करत असल्याचे दिसते. 

आणखी वाचा : नोरा फतेही गार्डन डान्स करताना आली हवा अन्..., पाहा काय झालं

हृतिक आणि सैफच्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या कलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर सुमारे 10.50 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, शुक्रवारी विक्रम वेधासाठी करण्यात आलेल्या आगाऊ बुकिंगमधून एकूण 2.97 कोटी रुपयांची कमाई केली होती. याचा अर्थ चित्रपट पाहण्यासाठी आलेले वॉक-इन प्रेक्षकांची संख्या ही जास्त होती. त्यामुळेच कलेक्शन हे 10 कोटींच्या पुढे गेले आहे. (vikram vedha day 1 box office collection hrithik roshan saif ali khan )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : Private Photo लीक ते साखरपूडा तुटण्यापर्यंत, ही अभिनेत्री आहे तरी कोण

2022 मधील बॉलीवूड चित्रपटांच्या सर्वात मोठ्या ओपनिंग कलेक्शनबद्दल बोलायचं तर, 'ब्रह्मास्त्र' आहे. या चित्रपटानं भारतात पहिल्या दिवशी 36 कोटी कमवले. यानंतरची यादी पाहिली तर हृतिक-सैफच्या 'विक्रम वेधा'चं ओपनिंग कलेक्शन या वर्षातील अनेक मोठ्या फ्लॉपपेक्षा कमी आहे. 

आणखी वाचा : शर्टाचं बटन उघडं सोडून अभिनेत्री पोहोचली एअरपोर्टवर, पाहाताच उडाली खळबळ

शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 'विक्रम वेध'च्या आगाऊ बुकिंगमध्ये खूप चांगली वाढ आहे. आगाऊ बुकिंगमध्ये, चित्रपटाची 13 हजार 800 पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत, जी शुक्रवारच्या तुलनेत 1 हजारानं जास्त आहेत. शनिवारसाठी 'विक्रम वेधा'चं आगाऊ बुकिंग 3.36 कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचं सांगण्यात येत आहे.  चित्रपटाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचाही फायदा होणार असं म्हटलं जातं आहे. 

आणखी वाचा : दीपिका आणि रणवीर वेगळे होणार? अभिनेता म्हणाला...

'विक्रम वेधा' भारतात 4000 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे हा एक मोठा चित्रपट म्हणता येईल. या चित्रपटात हृतिक आणि सैफ असे दोन टॉप स्टार्सही आहेत. अशा परिस्थितीत, ओपनिंगनुसार, 'विक्रम वेधा'ला बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. या चित्रपटाचे ओपनिंग वीकेंड कलेक्शन किती आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे.