Salman Khan Aishwarya Rai Affair : बॉलिवूड म्हटलं की, अभिनेता आणि अभिनेत्रीचं प्रेमकरण (Bollywood love affair) , ब्रेकअप (Breakup) , विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) अशा अनेक बातम्या रोजच्या दिवसाला समोर येतात. सध्या चाहत्यांना अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra & Kiara Advani ) यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. जेव्हा बॉलिवूडमधील ब्रेकअपबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात गाजलेलं प्रकरण होतं ते म्हणजे सलमान खान (Salman Khan ) आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai) यांचं...प्रेमापेक्षा यांच्या ब्रेकअपचे किस्से जास्त चर्चेले गेले. अभिनेता विवेक ओबेरॉयपासून (Vivek Oberoi) अचानक ऐश्वर्या अवॉर्ड फंक्शनमध्ये काळा चष्मा घालून येण्यापर्यंत...नेमकं सलमान खान असं काय करतो की ऐश्वर्याला आपला चेहऱ्या या काळा चष्मामागे लपवावा लागला होता. सलमानचं ते कृत्य हे त्यांचा प्रेमाला पूर्णविरामासाठी कारणभूत ठरलं...(Aishwarya Rai Bachchan Salman Khan Affair Salman physically abused Aishwarya What was the actress hiding by wearing black glasses at the award function video viral on Social media trending marathi news)
'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्यात जवळीक वाढली होती. त्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. बॉलिवूडमधील सूत्रांनुसार हे नातं जास्त काळ टिकलं नाही. असं म्हटलं जातं की, सलमान खान ऐश्वर्याबद्दल खूप पझेसिव्ह होता. त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं असं बोलं जातं. अशीही अफवा समोर आली होती की, सलमान खान यांच्या भावाला मदत करु नये, अशी ऐश्वर्या रायची इच्छा होती. मीडिया रिपोर्टनुसार असंही बोलं गेलं होतं की, सलमान खान त्याचा कुटुंबियांसोबत राहू नये, अशी ऐश्वर्या रायची इच्छा होती.
सगळ्यात धक्कादायक हे होतं की, सलमान खान अभिनेत्रीला शारीरिक इजा करायचा, अशा चर्चा समोर आल्या होत्या. ही अफेवा वारासारखी अख्खा जगात पसरली जेव्हा ऐश्वर्या राय एका अवॉर्ड फंक्शनमध्ये रात्रीच्या वेळी काळा चष्मा घालून सगळीकडे वावरत होती. अगदी तिने स्टेजवर गेल्यावरही तो चष्मा काढला नव्हता. यानंतर सलमान खान ऐश्वर्या रायला मारहाण करतो या बातमीने जोर धरला. सल्लू ऐश्वर्याला मारायचा त्यामुळे ती काळा चष्मा घालून आली होती, असं बोलं जाऊ लागलं.
मात्र ऐश्वर्याने कधीही या बातम्यांना दुजोरा दिला नाही. त्यावेळी ती म्हणाली होती की, पायऱ्यांवरुन पडल्यामुळे तिला जखम झाली होती. आता खरं काय ते या दोघांनाच माहिती. पण बॉलिवूडमध्ये एकाचं दोन होणं यात काही नवलं नाही. त्याशिवाय बॉलिवूड हे एक मायाजाळ आहे इथे अनेक घटना समोर येतं असतात.