श्रीदेवींच्या निधनानंतर करण जोहरने रद्द केला 'हा' चित्रपट

भारतातील पहिली महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत दुर्देवी अंत झाला.

Updated: Mar 6, 2018, 07:53 PM IST
श्रीदेवींच्या निधनानंतर करण जोहरने रद्द केला 'हा' चित्रपट   title=

मुंबई  : भारतातील पहिली महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत दुर्देवी अंत झाला.

वयाच्या 54व्या वर्षी श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. श्रीदेवींच्या अकाली निधनानंतर बॉलिवूडप्रमाणेच त्यांच्या चाह्त्यांना मानसिक धक्का बसला आहे.  

करण जोहर आणि कपूर कुटुंबीय जवळ - 

सिने निर्माता करण जोहर कपूर कुटुंबीयांच्या जवळ  होता. श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी कपूर करण जोहर दिग्दर्शित 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहर लवकरच श्रीदेवींसोबतही एक चित्रपट करणार होता. या चित्रपटामध्ये श्रीदेवी  आणि संजय दत्त ही जोडी दिसणार होती. सोबतच या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्टदेखील झळकणार होते.  

रद्द केला चित्रपट 

'शिद्दत' या करण जोहरच्या चित्रपटामध्ये श्रीदेवी काम करणार होती. मात्र अचानक निधन झाल्याने आता भविष्यात हा चित्रपट करणार नसल्याचे करण जोहरने ठरवले आहे. कोणतीच अभिनेत्री श्रीदेवीची जागा घेऊ शकत नाही असे त्याचे म्हणणे आहे.