इरफान खानसाठी बॉलिवूड कलाकारांंच्या शुभेच्छा !

  अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वी आरोग्याच्या समस्याचे कारण देऊन शूटिंग रद्द केले होते. सुरूवातीला कावीळ असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली होती. मात्र आता हा एखादा गंभीर आजार असू शकतो असे सांगण्यात आले आहे. 

Updated: Mar 6, 2018, 07:13 PM IST
इरफान खानसाठी बॉलिवूड कलाकारांंच्या शुभेच्छा !   title=

मुंबई :  अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वी आरोग्याच्या समस्याचे कारण देऊन शूटिंग रद्द केले होते. सुरूवातीला कावीळ असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली होती. मात्र आता हा एखादा गंभीर आजार असू शकतो असे सांगण्यात आले आहे. 

इरफानचे ट्विट  

अभिनेता इरफान खानने केलेल्या ट्विटनुसार त्याला एका गंभीर आजाराचा धोका आहे. यामुळे मागील 10-15 दिवसांमध्ये त्याच्या पायाखालची जमिन सरकली आहे. लवकरच रिपोर्ट हातात येणार असून भविष्यातील या आजाराचे उपचार ठरवले जातील अशी माहिती इरफानने ट्विट केली आहे. दरम्यान या काळात चाहत्यांना, मित्रपरिवाराला त्याने प्रार्थना करण्याची मागणी केली आहे.  

कलाकारांनी पाठवल्या शुभेच्छा 

इरफान खानच्या अभिनयाची जादू बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही दिसली. मात्र अचानक आलेल्या आजारपणामुळे इरफानच्या चित्रपटाचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. इरफान खानला निमरत कौर, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी सारख्या कलाकारांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. 

 

 

 

विशाल भारद्वाजने रद्द केले शूटिंग 

इरफान खानचा 'ब्लॅकमॅन' हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर  इरफान विशाल भारद्वाजच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. परंतू या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार्‍या इरफान खान आणि दीपिका पादूकोण या दोन्ही कलाकारांची स्थिती बिघडल्याने चित्रपटाचे शूटिंग रद्द केल्याचे केल्याचे विशाल भारद्वाज यांनी फेसबूकच्या माध्यमातूनही कळवले आहे.